मुक्तपीठ टीम
कोकणातील राजापूरमधील रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. राज्य सरकारने केंद्राला कोकणातील नाणारशेजारील गावात रिफायनरीसाठी जमीन देण्याची तयारी दर्शवल्याच्या बातम्यांनी नाणार आंदोलकांचा संताप वाढला आहे. तर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नाणारमधील संताप अद्याप कायम असल्याचे सांगत विदर्भात तो प्रकल्प नेण्याची काँग्रेस नेत्याची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, नाणार रिफायनरीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. “राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी शिवसेनेने कधीच पुढाकार घेतला नाही. कोकणात नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी माझी भेट घेतली. त्यांनी नाणार प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही त्याचे स्वागत करू,” अशी भूमिका मांडली.
आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही!
- त्या प्रकल्पाला किंवा कोणत्या विकास कामाला, राष्ट्रीय विकासाला खिळ घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कधीच पुढाकार घेतला नाही.
कोकणात ज्या भागात हा प्रकल्प होत आहे. - तिकडची शेती, फळबागा, समुद्र, मच्छिमार समाज यांचा विरोध प्रकल्पाला आहे.
- कारण या प्रकल्पामुळे त्यांच्या रोजीरोटी, शेती आणि फळबागा नष्ट होतील.
- यासाठी त्यांचे आंदोलन तेव्हासुद्धा सुरु होते आणि आजही ते आंदोलन नाणार भागात संपलेले नाही.
- याचा अर्थ तो प्रकल्प होऊ नये असे नसल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.
नाणार प्रकल्प विदर्भात नेण्याची काँग्रेस नेत्याची मागणी!
- राऊत पुढे म्हणाले की, विदर्भातील काँग्रेसचे नेते आशिष देशमुख भेटून गेले.
- त्यांनी सांगितले की, हा प्रकल्प विदर्भात नेता आला तर आम्ही स्वागत करु, समृद्धी महामार्ग जो होत आहे. त्याच्या आसपास पाण्याच्या जागा आहेत.
- तिथे हा प्रकल्प होऊ शकला तर त्याचा फायदा महाराष्ट्र आणि विदर्भाला होईल.
- याचा अर्थ त्या प्रकल्पाला विरोध नाही तर विरोध लोकांचा आहे तो त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आहे.