मुक्तपीठ टीम
मुंबई मनपामध्ये नगरसेवकांची सत्ता गेली. यानंतर मुंबई मनपामध्ये प्रशासकांची सत्ता आल्यानंतर मुंबई मनपाची करवसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. मालमत्ता कर थकल्याने मुंबई मनपाकडून थकीत कर असलेल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी मालमत्ता जप्त केलेल्या थकबाकीदारांना मनपा आता १५ दिवसांची अंतिम नोटीस देणार आहे.
मालमत्तांचा लिलाव केला जाणार…
- या मुदतीत थकबाकी भरली नाही तर मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे.
- यासाठी जप्त मालमत्तांचे मूल्य ठरवण्यासाठी निविदा मागवून लवकरच संस्थेची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती मनपाच्या कस संकलन व निर्धार विभागाचे सहआुक्त सुनील धामणे यांनी दिली आहे.
- थकबाकीदारांकडील मालमत्ता कर वसुलीसाठी एक कृती आराखडा तयार करण्यात आला होता.
- या आराखड्यानुसार यंदा मालमत्ता करारतून सहा हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट ठेवण्यात आले होते.
- या टार्गेटनुसार आतापर्यंत ५०३० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
- म्हणजेच जवळपास ८४ टक्के वसुली पूर्ण झाल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
आतापर्यंत तब्बल पाच हजार ८२१ मालमत्ता जप्त…
- मनपाने थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी केलेल्या कारवाईत आतापर्यंत तब्बल पाच हजार ८२१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
- यामध्ये इमारती, भूखंड, कार्यालये, हेलिकॉप्टरस वाहने, संगणक, एसी अशा वस्तूंचा समावेश आहे.
- यामध्ये तीन हजार ९७८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
- तर जप्ती कारवाईतून आतापर्यंत ७२८ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.
- या मालमत्तांचा लिलाव करण्यासाठी मनपाने कायद्यातही तरतुद करून घेतली आहे.
थकीत मालमत्ता धारकांकडून दोन टक्के दंडासह कराची वसुली करण्यात येणार…
- दरम्यान मनपाकडून थकीत मालमत्ता धारकांच्या आतापर्यंत पाच हजार ८२१ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
- त्यांच्याकडून आता दोन टक्के दंडासह कराची वसुली करण्यात येणार आहे.
- त्यासाठी लवकरच त्यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे.
- जर नोटीस पाठवूनही कराचा भरण न केल्यास संबंधित मालमत्तेचा मनपाच्या वतीने लिलाव करण्यात येणार आहे.