मुक्तपीठ टीम
भारती एअरटेलने 5G तंत्रज्ञानाला उपयोगात आणत काय करणं शक्य आहे त्याचे प्रयोग सादर केले आहेत. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषकातील कपिल देव यांच्या संस्मरणीय १७५ धावांचा स्टेडियम अनुभव नुकताच सादर करण्यात आला. त्यासाठी एअरटेलने नेक्स्ट जनरेशन नेटवर्क म्हणजेच इमर्सिव्ह व्हिडीओ तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यातून वास्तवात डिजिटल रिअॅलिटीला एकत्र आणण्यात आलं
एअरटेलने 5G Enable सक्षम असलेला होलोग्राम देखील प्रदर्शित केला. यात महान क्रिकेटपटूचा ‘व्हर्च्युअल’ अवतार दाखवण्यात आला होता. हा अवतार दूरच्या भागातील लोकांशी बोलताना दिसत होता. हाय-स्पीड 5G टेस्ट नेटवर्कवर ‘इमर्सिव्ह व्हिडीओ’ तंत्रज्ञानाचा वापर करून एअरटेलने १९८३ क्रिकेट विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देवच्या संस्मरणीय १७५ धावांचा स्टेडियम अनुभव पुन्हा तयार केला.या कामगिरीदरम्यान सामन्यातील महत्त्वाचे क्षण सादर केले गेले.
For cricket lovers like you! Presenting India’s first LIVE 5G powered hologram, as @therealkapildev ‘s virtual avatar interacts with fans in real-time from a remote location. Step into the future and experience the immersive technology. #FutureIsAirtel5G pic.twitter.com/MtSsrVx6sv
— airtel India (@airtelindia) March 26, 2022
बीबीसी टीव्हीच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कपिल देव यांच्या त्या खेळीचा कोणताही व्हिडीओ नाही. एअरटेलने एरिक्सनची 5G उपकरणे वापरून 5G काय करू शकते हे प्रात्यक्षिक दाखवले. 3500 एमएचझेड बँड टेस्ट स्पेक्ट्रममध्ये गुरुग्रामच्या मानेसर येथे ‘नेटवर्क एक्सपिरियन्स सेंटर’ येथे दिले. पन्नासाहून अधिक यूजर्सनी प्रात्यक्षिकादरम्यान 1 GBPSपेक्षा जास्त इंटरनेट गती असलेल्या 5G स्मार्टफोनवर सामन्याचे हायलाइट्स अनुभवले.
यादरम्यान, 5Gसह कपिल देव यांचा ‘व्हर्च्युअल’ अवतार मंचावर आला आणि त्यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. त्याद्वारे त्यांच्या सामन्यातील क्षणांबद्दलचे हायलाइट्स दाखवले.