मुक्तपीठ टीम
राज्याचे पर्यावरण आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.यशवंत जाधवांच्या डायरीतील मातोश्री उल्लेखावर प्रश्न विचारला. त्यावेळी आदित्य ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली. अफवांच्या बातम्या केल्या जातात, अफवांवर किती लक्ष द्यायचं? असं म्हणत त्यांनी यावर काहीही बोलणार नाही, असं सांगितले. त्याचवेळी राजापूरातील स्थानिकांसाठी तसेच स्थानिक शिवसेना नेत्यांच्या राजकीय भविष्यासाठी महत्वाचा मुद्दा असणाऱ्या नाणार रिफायनरीवर मात्र ते बोलले.
अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही…
- अफवांवर किती बोलायचं आणि अधिकृत गोष्टींवर किती बोलायचं हे महत्त्वाचं आहे.
- आताच्या काळात अफवा किती पसरविल्या जात आहेत हे तुम्हीही पाहत आहात.
- इतरांकडून फिडिंग येतं आणि त्या अफवांच्या बातम्या होतात.
- त्या खोलात मी जाणार नाही.
- ज्या अधिकृत गोष्टी आहेत त्या बाहेर येतीलच.
- पण अफवांवर किंवा बदनामीच्या गोष्टींवर मी बोलणार नाही.
हा धोकादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी…
- राजकीय षडयंत्र चाललं आहे.
- ज्या ठिकाणी भाजपाचं सरकार नाही तिथे या गोष्टी सुरू आहेत.
- या गोष्टीला कुठेही न घाबरता बिनधास्तपणे सामोरे जावं लागणार आहे.
- टक्कर द्यायला महाराष्ट्र सज्ज आहे.
- ज्या ज्या ठिकाणी यंत्रणा मागे लागल्या तिथे हे लोक तोंडावर पडत आहेत.
- राजकारण एका ठिकाणी, पण जे घाणेरडं राजकारण सुरू आहे, बदनामी सुरू आहे, अफवा सुरू आहे, यंत्रणाचा गैरवापर होत आहे हे कुठे तरी थांबलं पाहिजे.
- ही देशाची संस्कृती नाही.
- घाणेरड्या राजकारणाचा प्रकार थांबला पाहिजे.
- सत्तेतून बाहेर गेल्याचं जे नैराश्य येतं त्यातून विंडिक्टीव्ह पॉलिटिक्स सुरू आहे.
- हा धोकादायक प्रकार आहे महाराष्ट्रासाठी.
नेत्यांमधली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे…
- तानाजी सावंत यांनी निधी वाटपावर नाराजी व्यक्त केली आहे.
- त्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी, ज्या ठिकाणी दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात लढलेले असतात त्या ठिकाणी खदखद होते.
- पण ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न सुरू असतो.
- राजकारणात असं थोडं पुढे मागे होत असतं.
- आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्रं आलो आहोत.
- त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत.
- सर्व खासदार आमदारांशी चर्चा केली तर सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्रत्येक मतदारसंघाला न्याय दिला आहे.
- एक दोन लोकांना अधिकचं जास्त मिळतं, काहींना कमी मिळालं असेल तर त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नाणारमधील रिफायनरी प्रकल्पाचं काय?
- नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव केंद्राने मांडला होता.
- पण तेथे लोकवस्ती असल्याने नाणारमधून तो बाहेर हलवला.
- चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे.
- स्थानिकांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे.
- विश्वासावर पाय देऊन सरकार पुढे जाणार नाही.
- दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन.