Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मशिदींवरील भोंग्यांविरोधात भाजपा नेते मोहित कंबोजांनी आवाज उठवला!

March 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Masjid with Loudspeaker

मुक्तपीठ टीम

भाजपा नेते मोहित कंबोज आता मुंबईतील मशिदींवरील बेकायदा भोंग्यांच्या विरोधात मैदानात आले आहेत. त्यांनी हे भोंगे त्वरित हटवावेत, अशी मागणी केली आहे. विशेषतः वांद्रे, वर्सोवा आणि मोहम्मद अली रोड येथील मशिदींवर ही कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले. याबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयानेही निकाल दिला असल्याची माहीती मोहित कंबोज यांनी दिली आहे. लाऊडस्पीकरमुळे हृदयरोगी व इतर रुग्णांना खूप त्रास होतो, असा दावा करत कंबोज यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी ही मोहीम सुरू करावी, अशी मागणी केली आहे.

 

अलाहाबाद उच्च न्यायालयाने घातली आहे धार्मिक स्थळांच्या ध्वनिप्रदूषणावर बंदी

  • उत्तरप्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालायने २०१५मध्येच मशिदीतील लाऊडस्पीकर आणि मंदिरातील आवाजांवर बंदी घातली आहे.
  • धार्मिक स्थळांमधील ध्वनीप्रदूषणाविरोधात हा आदेश आहे.
  • गेल्या वर्षी एका व्यक्तीने त्याचे पालन होत नसल्याने न्यायालयाच्या अवमाननेची कारवाई करण्याची मागणी केली होती.
  • पण तशी कारवाई करण्याऐवजी न्यायालायाने निवडणुकीसाठीचा स्टंट असल्याचं मत नोंदवत याचिका फेटाळली होती.

 

मशिद लाऊडस्पीकर बंदीच्या याचिकेवर गुजरात उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

  • गुजरात उच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारीला एका जनहित याचिकेवर राज्य सरकारला नोटीस बजावली.
  • याचिकेत गुजरात सरकारला मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर बंदी घालण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.
  • मुख्य न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती आशुतोष जे शास्त्री यांच्या खंडपीठाने गुजरातमधील गांधीनगर
  • जिल्ह्यातील डॉक्टर धर्मेंद्र विष्णूभाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावली आहे.
  • राज्यातील ध्वनिप्रदूषण नियमांनुसार मायक्रोफोनच्या वापरासाठी किती आवाजाची परवानगी आहे, अशी विचारणा न्यायालयाने सुनावणीदरम्यान केली.
  • यावर याचिकाकर्त्याकडून सांगण्यात आले की, 80 डेसिबलपर्यंत आवाजाची परवानगी आहे, परंतु मशिदी २०० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे लाऊडस्पीकर वापरत आहेत, अशी माहिती देण्यात आली.

 

सर्वोच्च न्यायालयानेही दिले होते ध्वनिप्रदूषण नियंत्रणाचे आदेश!

  • याचिकाकर्त्याने चर्च ऑफ गॉड विरुद्ध केकेआर मॅजेस्टिक कॉलनी वेल्फेअर असोसिएशन इन इंडिया आणि इतर प्रकरणातील २००० मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला, ज्याने ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्याबाबत निर्देश जारी केले होते.
  • याचिकाकर्त्याने म्हटले आहे की कोणताही धर्म किंवा धार्मिक संप्रदाय असा दावा करू शकत नाही की प्रार्थना किंवा उपासनेसाठी किंवा धार्मिक सण साजरे करण्यासाठी लाऊडस्पीकरचा वापर हा धार्मिक प्रथेचा अविभाज्य भाग आहे आणि घटनेच्या कलम २५ अंतर्गत संरक्षित आहे.
  • चर्च ऑफ गॉडच्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार चर्चला लाऊडस्पीकर वापरण्याचा अधिकार नाही आणि एखाद्या नागरिकाला नको ते ऐकण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही.

Tags: BJPMohit kambojभाजपामशिदींवरील भोंगेमोहित कंबोज
Previous Post

दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प लोकांना ‘आप’ला का वाटतोय? समजून घ्या कारणं…

Next Post

#मुक्तपीठ Live सिंधुदुर्गात शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं भाषण

Next Post
#मुक्तपीठ Live सिंधुदुर्गात शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं भाषण

#मुक्तपीठ Live सिंधुदुर्गात शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं भाषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!