मुक्तपीठ टीम
नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात रेडिओलॉजिस्ट आणि एक्स-रे तंत्रज्ञ या पदांवर एकूण ०६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती नवी मुंबई विभागात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
१. रेडिओलॉजिस्ट
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी. (रेडिओलॉजिस्ट) पदवी, तसेच पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद पदव्युत्तर पदविकाधारकामधून डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ डायग्नोसिस भरण्यात येईल.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
२. एक्स-रे तंत्रज्ञ
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी
- मान्यताप्राप्त संस्थेतून किंवा विद्यापिठातून रेडिओग्राफी पदविका उत्तीर्ण
- शासकीय/ निमशासकीय/ स्थानिक स्वराज्य संस्था/ खासगी रुग्णालयातील एक्स-रे तंत्रज्ञ विषयक कामाचा २ वर्षांचा अनुभव आवश्यक
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमानुसार असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी अर्ज पाठवावा.
अधिक माहितीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइट https://www.nmmc.gov.in/navimumbai/ वरून माहिती मिळवू शकता.