Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सफाई कर्मचारी महिलेच्या स्टेजवर पाया पडले…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Jyotiraditya shinde touched feet of women Sweeper

मुक्तपीठ टीम

राजकीय नेते म्हटलं की ते नानाविध रुपात दिसतात. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचाही अपवाद नाही. नुकत्याच एका कार्यक्रमात शिंदेंनी सफाई कर्मचारी महिलेला आपुलकीनं मंचावर नेलं. तिथं त्यांनी तिच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ते तिच्या पाया पडले. आशीर्वाद घेतले. त्यांनंतर आपल्या भाषणात त्यांनी त्यामागील भूमिकाही मांडली, “सफाई कर्मचारी आमचे देव आहेत, म्हणून मी त्यांच्या पाया पडलो!” टीकाकार म्हणतात तसा तो राजेशाही प्रतिमेतून बाहेर येण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्नांचा भाग मानला तरी त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असं मत व्यक्त होत आहे.

 

भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे त्यांच्या ग्वाल्हेरच्या महाराजांच्या प्रतिमेच्या वलयातून बाहेर येण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. ग्वाल्हेरमध्ये स्वच्छता सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि आरोग्य तपासणी करण्यासाठी जिवाजी विद्यापीठाच्या अटल सभागृहात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Jyotiraditya shinde gifted Safety kit to sweepers

घडलं ते धक्कादायक मात्र कौतुकास्पद…

  • केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे स्टेजवरून खाली उतरले.
  • खाली बसलेल्या एका सफाई कर्मचाऱ्याचा हात धरून त्यांना स्टेजवर आणले. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरूवात केली. त्यानंतर महिला सफाई कर्मचारीला त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसवून सफाई कर्मचारी त्यांचासाठी देव असल्याचे त्यांनी मांडले.

 

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी २५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ आणि स्वच्छता किट देऊन त्यांचा गौरव केला. त्याचवेळी त्यांनी महिला सफाई कर्मचाऱ्यांच्या पाया पडत स्वच्छता व्यवस्थेत सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ज्योतिरादित्य शिंदे त्यांचा भाषणादरम्यान म्हणाले की, सफाई कर्मचारी आमचे देव आहेत, म्हणून मी त्यांच्या पाया पडलो. यासोबतच ते म्हणाले की, जर कोणी शहरात स्वच्छता राखत असेल तर ते आपल्या सफाई कर्मचाऱ्यांचे परिश्रम आहेत, त्यामुळे त्या सर्वांचा आदर करणे आपले परम कर्तव्य आहे.

Jyotiraditya shinde hold hand of sweeper and sat her beside him

संपूर्ण कार्यक्रमात शिंदेच्या शेजारी बसलेली महिला सफाई कर्मचारी खूप आनंदी दिसत होती. त्या म्हणाल्या की केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना एवढा सन्मान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सन्मानाने त्या खूप खूश आहेत आणि यासोबतच महिला सफाई कर्मचाऱ्यांनी शिंदे यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा व्यक्त केली.


Tags: Civil Aviation Minister Jyotiraditya ScindiaGwaliorSweepersग्वाल्हेरज्योतिरादित्य शिंदेभाजपासफाई कर्मचारीस्वच्छता सर्वेक्षण २०२२
Previous Post

जमिनीवरून हवेतील लक्ष्य साध्य करणाऱ्या भारतीय मिसाईलची यशस्वी चाचणी!

Next Post

राज्यात १४० नवे रुग्ण, १०६ रुग्ण बरे! दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही !!

Next Post
Corona

राज्यात १४० नवे रुग्ण, १०६ रुग्ण बरे! दिवसभरात एकही कोरोना मृत्यू नाही !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!