मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा दापोलीतील कथित रिसॉर्ट तोडण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या दापोलीत दाखल झाले आहेत. यावेळी ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे. सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. दापोली पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर दापोली पोलिस ठाण्याच्या बाहेरच किरीट सोमय्या यांनी ठिय्या मांडला. त्यानंतर सोमय्यांनी शिवसेनेवर काही गंभीर आरोपही केले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
उद्धव ठाकरेंविरोधात कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही!
- उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस थोड्या स्पष्ट, स्वच्छ, अलंकारिक भाषेत उत्तर देतात.
- पण मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, तुमच्या सांगण्यावरुन तुम्हाला अटक होणार नाही.
- तुमचा भ्रष्टाचार समोर आला की तुम्हाला सांगण्याचीही गरज भासणार नाही.
- तुमच्याविरोधात कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही.
- तसंच काल आयकर विभागाचे डिटेल्स आहेत.
- एका कंपनीचे आकडे दिले आहेत.
- त्यात आदित्य, तेजस, रश्मी ठाकरे पार्टनर असलेल्या कंपनीत ७ कोटीचं मनी लॉन्ड्रिंग.
- तो जो नंदकिशोर चतुर्वेदीसोबत उद्धव ठाकरे परिवाराने किती व्यवहार केला ना तो सगळा बाहेर काढणार.
हिंमत असेल तर रिसॉर्ट वाचवा…
- सोमय्या पुढे म्हणाले की, मला कौतुक करायचं आहे दापोलीतील नागरिकांचं.
- दिवाळीत आल्यावर दापोलीकरांना वचन दिलं होतं की अनिल परबची माफियागिरी संपवल्याशिवाय राहणार नाही.
- समजतात काय स्वत:ला. मिलिंद नार्वेकरचा बंगला तुटला आणि अनिल परबचा रिसॉर्ट तोडणार.
- मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज देतो.
- तुमच्यात हिम्मत असेल तर अनिल परबचा रिसॉर्ट वाचवून दाखवा, मी तोडून दाखवणार.
- माफिया सेना उभी केली, वसुलीचे पैसे येतात.
- सचिन वाझेपासून प्रदीप शर्मा सुपारीबाज… आता नरेंद्र मोदींनी सांगितलं ना ना खाऊंगा ना खाने दुंगा.
- महाराष्ट्रातील घोटाळेबाजांना आम्ही सोडणार नाही.
- नाटकं काय करतात, पोलिस नोटीस देतात.
- अडकणार पोलीस, इथला इन्स्पेक्टर.
- पोलिस काय सांगतात तर रिसॉर्ट तुटल्यावर बेरोजगारी निर्माण होईल.
- मोदी सरकारनं दापोली कोर्टात अनिल परब विरोधात फौजदारी कारवाई करावी असं अपील केलंय.
- पोलिसांना बळीचा बकरा काय करताय.
सोमय्यांचा पोलीस आणि शिवसेनेवर गंभीर आरोप!
- रत्नागिरीचे एसपी आणि शिवसेनेचे माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचले आहे.
- शिवसेनेचे कार्यकर्ते तुमचा घातपात होणार आहे,असे एसपीने मला लिखित दिले आहे.
- माझा घातपात होणार असल्याचे सागत त्यांनी कार्यकर्त्यांना लाबं ठेवले आहे.
- आम्हाला रिसॉर्टला जायचंच आहे.
- एसपी शिवसेनेचा माफिया झालेला आहे.
- पोलीस अधीक्षक हे कोणाच्या तरी सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोपही सोमय्या यानी केली आहे.
- रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांची चौकशी झाली पाहिजे.
- दापोली पोलिस ठाण्याच्या बाहेरच किरीट सोमय्या यांनी ठिय्या मांडला.
- पोलिस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर सोमय्या यांनी मौन धारण केले.
“‘तो’ रिसॉर्ट माझा नाही, हिंमत असेल तर तोडा! सोमय्यांचा माझ्या बदनामीचा डाव!” – अनिल परब
- किरीट सोमय्या वारंवार माझ्या बदनामीचा प्रयत्न करतात.
- मी सर्वप्रथम स्पष्ट करतो की तो रिसॉर्ट माझा नाही.
- सर्व कागदपत्र तपासली गेलीत. मी न्यायालयातही गेलो आहे. सोमय्या काही नगरपालिकेचे नोकर नाहीत. ते कसे तोडणार? पण तरीही त्यांनी हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडावा.