मुक्तपीठ टीम
बँक ऑफ बडोदामध्ये ब्रांच रिसिवेबल मॅनेजर या पदांवर एकूण १५९ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १४ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरती संपूर्ण भारतात होणार आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २३ ते ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ६०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट https://www.bankofbaroda.in/ वरून माहिती मिळवू शकता.