मुक्तपीठ टीम
भाजपाशी जुळवून घेतलं तर शिवसेना नेत्यांवर विनाकारण कारवाई होणार नाहीत, अशी भाजपाशी मैत्रीची भूमिका मांडणाऱ्या आमदार सरनाईकांची ११ कोटी ३६ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची भीती सार्थ ठरली असतानाच त्यांनी घेतलेली भूमिका व्यर्थ गेल्याचं मानलं जातं. प्रताप सरनाईक ईडीने यांना दणका दिला आहे. NSEL या घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ठाण्यातील दोन फ्लॅट आणि टिटवाळा येथिल भूखंड जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यातील शिवसेनेला हा दुसरा धक्का बसला आहे.
मनी लॉँड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसत आहेत. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी प्रताप सरनाईक ११ कोटी ३५ लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. एनएसीएल घोटाळ्यापर्करणी ईडीची चौकशी सुरु होती आणि अनेकवेळा सरनाईक यांना समन्स पाठवण्यात आले होते. त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या ११ सदनिका जप्त केल्या होत्या. याची किंमत ६ कोटींच्या आसपास होती.
प्रताप सरनाईकांच्या पत्रात काय होतं?
“…म्हणाले होते राष्ट्रवादी शिवसेना फोडतेय, भाजपा ईडी मागे लावतेय…जुळवून घ्या!”