मुक्तपीठ टीम
नुकत्याच मनसेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या व राज्य महिला आरोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुढच्या महिला प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. रूपाली पाटील ठोंबरे यांनी महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जर संधी मिळाली तर चांगलं काम करुन दाखवेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या रुपाली पाटील?
- रुपाली ठोंबरे पाटील यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. त्या त्या म्हणाल्या की, “राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
- त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी काम करताना ही जबाबदारी अत्यंत उत्तमपणे पेलली.
- एका व्यक्तीला दोन पदे असू नयेत म्हणून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत.
- महिलांवर होणाऱ्या अन्यायावर त्यांनी तत्परतेने काम केलं आहे.
- महिला प्रदेशाध्यक्षपदी मला जर संधी मिळाली तर मी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करेन.
- ज्या विश्वासाने मला पक्षात प्रवेश दिला तो विश्वास सार्थ करेन.
रुपाली चाकणकरांकडे महिला आयोगाची जबाबदारी…
- गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.
- त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याकडेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार होता.
- गुरुवारी त्यांनी राजीनामा दिला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या चांगलं काम करत आहेत.