Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय – आफ्रिकन शेळी युती, एका शेळीला दीड लाखाची बोली!

February 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
african sheep

मुक्तपीठ टीम

तुम्ही म्हैस, बोकड, ३ लाखाला विकली गेल्याचे ऐकले होते. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एका शेळीची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याच्या बोर जातीच्या शेळीला चक्क १ लाख ५१ हजार रुपये किंमत मिळाली आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप मिसाळ यांचा शेती पूरक असा शेळी पालन व्यवसाय आहे. त्यांची एक शेळी ९ फेब्रुवारीला फलटण येथील शेळी पालन व्यवसाय करणारे तेजस भोईटे यांनी भेंडा येथे येऊन तब्बल १ लाख ५१ हजार रुपये मोजत ही बोर जातीच्या शेळी खरेदी केली आहेे. या आफ्रिकन बोर जातीच्या शेळीचा गर्भ देशी शेळीच्या गर्भाशयात ठेवून त्यापासून ही जात वाढविण्यात आलेली आहे. या पासून होणारे बोकड-शेळी मध्ये जास्त रोग प्रतिकार शक्ती, हाडांची साईज मोठी होते, दर दिवसाला २०० ते २५० ग्राम वजन वाढत जाऊन ३ महिन्यात २५ ते ३० किलो वजन होते अशी ही जात असुन या शेळीचा उपयोग खास करून मास खाण्यासाठी लोक वापर करत असल्याची माहिती संदीप मिसाळ यांनी दिली आहे. आज विक्री केलेली शेळी २ वर्षे वयाची असून ७० किलो वजन आहे. सध्या ती गाभण असून तिचे हे तिसरे वेत आहे. एका वेळी २ ते ३ पिल्लांना जन्म देते. किमान २ पिल्ले तर नक्की होतील आणि ते दोन-अडीच लाखाला विकले जातील, म्हणून तिला इतकी किंमत मोजली आहे.

भेंडा बुद्रुक येथील शेतकरी संदीप परशराम मिसाळ यांचा शेती व्यवसाय आहेत, मात्र शेतीतून जास्त उत्पन्न मिळत नसल्याने मिसाळ यांनी गेल्या पाच वर्षा पूर्वी आपल्या शेतीला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. सुरवातीला संगमनेरी, उस्मानाबादी, जातीच्या शेळ्या मिसाळ यांनी खरेदी करून शेळी पालन व्यवसाय सुरू केला, मात्र यातुन जास्त उत्पन्न मिळत नसल्याने मिसाळ यांनी फलटण येथील ( निमकर सीड ला ) भेट दिली त्यावेळी त्यांनी एक आफ्रिकन बोर जातीचा बोकड 40 हजार रुपयांना खरेदी केला आणि या ओरिजिनल आफ्रिकन बोर जातीच्या नरापासून (बोकडापासून) आपल्याकडे असलेल्या संगमनेरी, उस्मानाबादी जातीच्या ( मादी ) शेळ्यांना १०० टक्के ब्रिडिंग करण्यास सुरुवात केले आहे. आज मातीला ब्रिडिंगच्या १० ते १२ मादी आणि ब्रिडिंगच्या ३ ( शेळया) मिसाळ यांच्या गोट्यात आहेत, यातील आफ्रिकन बोर जातीची एक शेळीची आज विक्री झाली. फलटण येथील मल्हार गोट फार्मचे मालक तेजस भोईटे यांनी आज भेंडा येथे येऊन १ लाख ५१ हजार रुपयांना शेळी खरेदी केली आहे.

 

भेंडा बुद्रुक येथील संदीप परशराम मिसाळ या शेळी पालन करणाऱ्या व्यवसायिकाच्या गोटातील शेळी तब्बल १ लाख ५१ हजार रुपयांना विक्री झाल्याची माहिती व्यर्या सारखी जिल्हात पसरू लागल्याने जिल्हात काही शेतकऱ्यांनी आज सकाळ पासुन मिसाळ यांच्या गोटावर मोठी गर्दी केल्याची पहिला मिळत आहे. तर शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिसाळ आफ्रिकन बोर जातीची शेळी पालन करण्यावर जास्त भर देऊन आपली आर्थिक उन्नती साधण्याचे अहावान केले आहे. सध्या तरी मार्केटला आफ्रिकन बोर जातीच्या ( बोकड आणि शेळीला मागणी कमी आहे. मात्र येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्याचंही यावेळी मिसाळ म्हणाले आहे..

( ओरिजिनल आफ्रिकन बोर जातीच्या नरापासून (बोकडापासून) १०० टक्के ब्रिडिंग केलेली ही शेळी आहे. ओरिजिनल नराची (बोकड) किंमत ११ ते १२ लाख रूपयांचे पुढे आहे. त्यामुळेच या शेळ्यांना इतकी किंमत मिळते )


Tags: african sheepsheepआफ्रिकन बोरशेळी
Previous Post

‘व्हेलेटाइन डे’ आला तरी गुलाबांना मागणी नाही, शेतकरी कोमेजलेलेच!

Next Post

“अनाथ बालकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील”

Next Post
bachuu kadu

"अनाथ बालकांच्या हक्कांच्या जपणुकीसाठी शासन संवेदनशील"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!