मुक्तपीठ टीम
बाउन्स इन्फिनिटीने बॅटरी सेवा देण्यासाठी ग्रीव्ह्ज कॉटनच्या ग्रीव्ह्ज रिटेलसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी बॅटरी स्वॅपिंग स्थानके पुरवण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीमुळे ग्रीव्ह्ज रिटेल ही बाउन्स इन्फिनिटीच्या बॅटरी-स्वॅपिंग नेटवर्कचा भाग झालेली पहिली कंपनी ठरली आहे. कंपनीने हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प राबवण्यासाठी बेंगळुरू शहराची निवड केली आहे.
या भागीदारीतून, कंपनीने देशाच्या विविध भागांतील १० शहरांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आखली आहे. या १० शहरांमध्ये प्रत्येकी ३०० बॅटरी स्वॅप स्टेशन्स तैनात केली जाणार आहेत. बॅटरी स्वॅपिंग सेवा इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स आणि थ्री-व्हीलर्स यांच्यासाठी असेल. अँपियरची सर्व लोकप्रिय मॉडेल्स ग्राहकांना लवकरच बीएएएससह उपलब्ध होऊ शकतील.
या व्हेंचरच्या माध्यमातून, ग्रीव्ह्ज आपल्या ईव्ही परिसंस्थेला आणखी चालना देत आहे. यामध्ये अनेक ब्रॅण्ड्सचे स्मार्ट वाहतूक पर्यायांमधील विस्तृत वैविध्य, ग्राहकांना अधिक चांगली विक्री व सेवा उपलब्ध करून देणे यांचाही समावेश आहे. आपल्या भारतभरातील रिटेल व्यवसाय नेटवर्कच्या माध्यमातून, सर्वसमावेशक थ्रीएस (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर आउटलेट्स) देणारी ग्रीव्ह्ज रिटेल उद्योगक्षेत्राला असंघटित क्षेत्र अधिक चांगले संघटित करण्यात तसेच अधिक कार्यक्षम पद्धतीने काम करण्यात मदत करत आहे.
बाउन्सचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेकानंद हल्लेकेरे या भागीदारीबद्दल म्हणाले, “बाउन्स आणि ग्रीव्ह्ज रिटेल परवडण्याजोगी व शाश्वत सोल्यूशन्स बाजारपेठेत आणण्यासाठी वचनबद्ध आहेत. अँपियर आमचे सहयोगी झाले याचा आम्हाला आनंद आहे. अँपियर आता आमचा बॅटरी स्वॅपिंग प्लॅटफॉर्म वापरतील. यामुळे अधिकाधिक भारतीयांना परवडण्याजोगी वाहतूक बीएएएससह उपलब्ध होईल.’’
ग्रीव्ह्ज कॉटनमधील ग्रीव्ह्ज रिटेल विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायव्हीएस विजयकुमार या भागीदारीबद्दल म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांची अखंडित ड्राइव्ह पुरवण्यासाठी वचनबद्ध असल्यामुळे, बाउन्स इन्फिनिटीशी झालेली ही भागीदारी आम्हाला उत्पादनांचा विस्तार करण्यात तसेच ईव्ही क्षेत्रातील आमचे आघाडीचे स्थान भक्कम करण्यात मदत करेल.”
हे स्मार्ट सोल्युशन निवासी संकुले, पेट्रोलपंप, रेस्टोरंट्स, कॅफेज, को-लिव्हिंग स्पेसेस, कॉर्पोरेट कार्यालये, किराणा दुकाने आदी विविध ठिकाणी उपलब्ध करून दिले जाईल आणि ग्रीव्ह्जने उत्पादित केलेली इलेक्ट्रिक वाहने येथे चार्ज करता येतील.
बाउन्स इन्फिनिटी स्वॅपिंग स्टेशन्स इंधन स्थानकांच्या तत्त्वावरच काम करतात. या स्टेशन्सवर ग्रीव्ह्ज रिटेलच्या ग्राहकांसाठी चार्ज्ड आणि रेडी-टू-गो बॅटरी उपलब्ध असतील; ग्राहकाकडील रिकाम्या होत आलेल्या बॅटरीसोबत या बॅटरीची अदलाबदल काही मिनिटांत करता येईल. ही संरचना काम करत असेल, तर ईव्ही ग्राहकांना आपली टू-व्हीलर्स किंवा थ्री-व्हीलर्स चार्ज होईपर्यंत वाट बघत बसावी लागणार नाही, बॅटरीच्या कक्षेची (रेंज) काळजी राहणार नाही किंवा चार्जिंगची आठवण ठेवावी लागणार नाही. ग्रीव्ह्ज इलेक्ट्रिक स्कूटर्ससोबत एकात्मीकरण आधीच पूर्ण झाले आहे आणि लवकरच ते ग्रीव्ह्जच्या अन्य मॉडेल्ससाठीही उपलब्ध करून दिले जाईल.
बाउन्स इन्फिनिटी स्वॅप स्टेशन्सची रचना, इंटरऑपरेबिलिटी, हा मुद्दा ध्यानात ठेवून करण्यात आली आहे. बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क विविध वाहन प्रकार, ब्रॅण्ड्स, मॉडेल यांना अनुकूल आहे. हे नेटवर्क भविष्यकाळाच्या दृष्टीने सज्ज आहे, सुधारित तंत्रज्ञानाने युक्त आहे आणि लाखो ग्राहकांना उपलब्ध होण्याजोगे आहे. शहरात कुठेही एक किलोमीटरच्या अंतरात बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स असावे असे बाउन्स इन्फिनिटीचे उद्दिष्ट आहे. कंपनी पुढील १२-२४ महिन्यांत दहा लाख स्कूटर्सना सपोर्ट करण्यासाठी दमदार स्वॅपिंग संरचनेची उभारणी करत आहे. कंपनीने, संरचना स्थापित करण्यासाठी, नोब्रोकर, पार्क प्लस, युनिगॅस, रेडीअसिस्ट, किचन्स@, हॅलोवर्ल्ड, गुडबॉक्स आदी ब्रॅण्ड्ससोबतही भागीदारी केली आहे.
About Bounce:
With a strong desire and determination to address the need to bring ease of commuting to people across many categories like small businesses, college students, office goers, etc., Bounce was launched in 2018. A blend of advanced digital solutions with a seamless operations network on the ground helped Bounce become India’s largest smart mobility solution.
In Dec last year, Bounce launched Infinity E1 as a consumer electric scooter with swappable battery technology. The Bounce Swapping Station network has a distribution of over 200 stations which have completed over 10,00,000 swaps and enabled over 4 crore EV kilometres.
Bounce is backed by marquee investors such as Accel India, Accel US, Sequoia Capital India, B Capital, Falcon Edge, Qualcomm, Chirate, Omidyar Network, Maverick Capital, etc., and has raised over USD 220 million.
About Greaves:
Greaves Cotton Limited is a diversified engineering company and a leading manufacturer of Cleantech Powertrain Solutions (CNG, Petrol and Diesel Engines), Generator sets, Farm equipment, E-Mobility, Aftermarket spares, and services. Greaves Cotton is a multi-product and multi-location company with a rich legacy and brand trust of over 160 years and has established itself as a key player impacting a billion lives every day. The company today manufactures world-class products and solutions under various business units and is backed by comprehensive support from 500+ Greaves Retail Centers& 6300+ smaller spare parts retail outlets across the country. In the mobility segment, the company manufactures 4 lakh plus engines annually, almost 1 engine per minute, and provides low TCO mobility solutions to the majority of the population in India, moving more than 1 crore passengers and 5 lakh tonnes of cargo every day. Greaves Cotton augmented its clean technology portfolio in the last mile affordable 2W personal Mobility segment with Ampere Vehicles in 2018.www.greavescotton.com
पाहा व्हिडीओ: