मुक्तपीठ टीम
मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक मोठा निर्णय सुनावला आहे. जोपर्यंत आई-वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलांचा मालमत्तेवर कोणताही अधिकार राहणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. एका महिलेच्या याचिकेवर न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे.
खरं म्हणजे, एका महिलेला तिच्या पतीवर उपचार करण्यासाठी तिची मालमत्ता विकायची होती. पण, त्यांचा मुलगा त्यात अडथळे आणत होता. आईला तिची मालमत्ता विकण्यापासून रोखत होता. आईने न्यायालयाचा आधार घेतला. मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या सोनिया खान यांच्या बाजूने निकाल दिला. याचिकाकर्त्या सोनिया खान यांनी सांगितले होते की, त्यांना पतीच्या सर्व मालमत्तेचे कायदेशीर पालक व्हायचे आहे.
याचिकाकर्त्याचा मुलगा आसिफ खान तिला असे करण्यापासून रोखत होता. तो वडिलांचा फ्लॅट विकण्याच्या आईच्या निर्णयाच्या विरोधात होता. त्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करत आईच्या बाजूने निकाल दिला. न्यायालयाने केवळ मुलालाच मोठा धक्का दिला नाही, तर प्रत्येक अपत्यास एका प्रश्नाचे उत्तरही दिले, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, आई-वडील जिवंत असताना मुलांना त्यांच्या मालमत्तेचा मालक बनण्याचा अधिकार नाही.
आसिफने आपल्या वडिलांच्या संपूर्ण मालमत्तेचे कायदेशीर पालक असल्याचे आपल्या याचिकेत म्हटले होते. त्यांने न्यायालयात आपला युक्तिवाद ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला. एक आईच्या नावावर, तर दुसरा वडिलांच्या नावावर असे आई-वडिलांचे दोन फ्लॅट असल्याचे त्यांने सांगितले.
न्यायालयात घर हे सामायिक कुटुंबाच्या श्रेणीत येते असा युक्तिवाद मांडण्याचा प्रयत्न
- असिफच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की फ्लॅट सामायिक कुटुंबाच्या श्रेणीत येतो. अशा स्थितीत फ्लॅटवर त्यांचा पूर्ण हक्क आहे.
- मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला.
- न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले आहे की, आसिफ हे सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहेत की त्याने आपल्या वडिलांची काळजी घेतली आहे.
- विभागीय खंडपीठाने आसिफचे सर्व दावे तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. तसेच वारसाहक्क कायद्यात कुठेही असे लिहिलेले नाही की पालक जिवंत असताना त्यांची मुले त्यांच्या मालमत्तेवर दावा करू शकतात.
न्यायालयाने मुलाची वृत्ती द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले
- न्यायालयाने आसिफचा युक्तिवादही फेटाळला, ज्यात त्याने म्हटले होते की त्याच्या आईकडे मालमत्ता विकण्याशिवाय इतर पर्याय आहेत.
- आसिफच्या प्रकृतीवरही न्यायालयाने भाष्य केले. त्याने कोर्टात दिलेला युक्तिवाद त्याच्या वागणुकीबद्दल सांगतो, असे सांगितले.
- न्यायालयाने त्याची वृत्ती द्वेषपूर्ण असल्याचे म्हटले. यासोबतच पतीच्या उपचारासाठी सोनियांना त्यांची मालमत्ता विकण्याची परवानगी देण्यात आली.