मुक्तपीठ टीम
‘लार्सन अँड टुब्रो’च्या ऊर्जा पारेषण व वितरण व्यवसायाला भारतात आणि परदेशात महत्त्वाच्या व मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.
राजस्थानमध्ये २४५ मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर या कंपनीच्या अक्षय ऊर्जा निर्मिती विभागाने पटकावली आहे.
गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात ‘सोलर फोटोव्होल्टेइक कम स्टोरेज’ प्रकल्प राबविण्यासाठी आणखी एक ऑर्डर कंपनीला मिळाली आहे. अवाढव्य स्वरुपाच्या या ‘ग्रीड इंटरअॅक्टिव्ह ग्रीन एनर्जी स्टोरेज’ प्रकल्पाची ३५ मेगावॅट (एसी) सौर क्षमता आहे, तसेच त्यामध्ये ५७ एमडब्ल्यूएच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बीईएसएस) असेल.
कंपनीने मध्य-पूर्व प्रदेशात १३२ केव्ही सबस्टेशन्समध्ये ‘शंट रीअॅक्टर्स’चा पुरवठा व उभारणी टर्नकी आधारावर करण्यासाठीच्या ऑर्डर्स पटकावल्या आहेत. हे ‘रीअॅक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन एलिमेंट्स’ दुबईच्या ‘इलेक्ट्रिसिटी इन्फ्रास्ट्रक्चर’च्या १३२ केव्ही नेटवर्कमध्ये जोडले जाणार आहेत, तसेच उपलब्धता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानके राखण्यात मदत करण्यासाठी व्होल्टेज नियंत्रणही प्रदान करणार आहेत. सध्या सुरू असलेल्या पारेषण लाईन प्रकल्पांमधूनही कंपनीला आणखी ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत.
पार्श्वभूमी
लार्सन अँड टुब्रो ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे. इपीसी प्रकल्प, हाय-टेक उत्पादन आणि सेवा या क्षेत्रांत ती कार्यरत आहे. जगभरातील ५०हून अधिक देशांमध्ये तिचा कारभार चालतो. मजबूत ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि उच्च-श्रेणीच्या गुणवत्तेसाठी सततचा शोध या वैशिष्ट्यांमुळे ‘एल अँड टी’ आपल्या कार्यक्षेत्रात नेतृत्व मिळवण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात गेली ८ दशके यशस्वी झाली आहे.
प्रकल्पांचे वर्गीकरण
वर्गीकरण महत्त्वपूर्ण मोठे अधिक मोठे उत्तुंग
आकडे कोटी रुपयांमध्ये १,००० ते २,५०० २,५०० ते ५,००० ५,००० ते ७,००० ७,००० पेक्षा जास्त