महेश कदम
शिमगा आणि कोकण…शिमगा म्हणजे कोकणाचा उत्साही उल्हास. गणपती सणानंतर कोकणातील चाकरमान्यांना वेध लागतो ते शिमग्याचे. मग त्यासाठी दोन दिवस का होईना कोकणी माणूस गावाला जाणारच. कोकणात शिमगा साजरा करण्याच्या प्रथा प्रत्येक जिल्हय़ात थोड्या वेगळ्याच अनुभवता येतात.
कोकणात शिमगा सणाला अधिक महत्त्व आहे. कोकण हे नैसर्गिक सौंदर्य ने नटलेला आहे. शिमगा खेळताना सारे समान असतात. त्यातून माती व नाती टिकून राहतात. मुंबईतील व अनेक ठिकाणी रहिवासी असलेले चाकरमणी होळी सणासाठी कोकणात धावून येतात.
कोकणातील रायगडच्या महाड तालुक्यातील वाकी गावात ग्रामदैवत आई सोमजाई देवस्थान मंदिर आहे. आई सोमजाई देवीची पाषाण मूर्ती ही पुरातन आहे. जुनी परंपरा राखत पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा केली जाते. आई सोमजाई देवी हे जागरूक देवस्थान आहे. अनेक पिढ्यांपासून लोकं भक्तिभावाने आईची पूजा अर्चना करतात, होळी ह्या सणात आई सोमजाई ची पालखी प्रतेक गावात घरोघरी फिरते, पालखी सजवली जाते, आईची खणा-नारळाने ओटी भरली जाते. तिची वाजत गाजत स्वागत केली जाते. गुलाल उधळत फटाके वाजवत एकच जल्लोष केला जातो.
रस्त्याने पालखी जाताना भाविक दर्शन घेत राहतात. घरांच्या अंगणात रांगोळी व सजावट केली जाते. ती वस्तीला असते. आरती, कीर्तन, भजन, पुजा, महाप्रसाद केला जातो. मान सन्मानाने तिची भक्ती व जयघोष केला जातो, आपल्या मनातील जी इच्छा असेल ते नवस केला जातो. नवस पूर्ण झाल्यावर तिची ओटी भरली जाते. अनेक जण तिच्या दर्शनाला आतुरतेने येतात मग तो मंत्री असो की सामान्य माणूस. उच्च व गरीब असो. जाती भेद व अहंकार वगळता एक समान होतात व आईच्या चरणी नतमस्तक होतात.
आई श्री सोमजाई देवस्थानच्या वतीने वर्षानुवर्ष आईचा सोहळा साजरा केला जातो. आई श्री देवी सोमजाई हे स्वयंभू पुरातन जागृत देवस्थान मानलं जातं.
शिमगोत्सवात आईच्या उत्सवासाठी कार्यक्रमांची रेलचेल
- देवीचा पालखी उत्सव हे शुक्रवार दिनांक: १८|३|२२ ते शनिवार दि: २६|३|२२ पर्यंत संपन्न होणार आहे.
- शुक्रवार दि: १८|३|२२, सकाळी १० ते ११वा.
- पालखी सजावट (गादीवर) नंतर पालखी सोमजाई मंदिराला भेट व प्रदक्षिणा होऊन शेवते गावाकडे प्रस्थान, रात्री गावठाण येथे वस्ती.
- शनिवार: १९ ता. सकाळी पालखी मिरवणूक गावठण व रात्री नानेमाची येथे वस्ती.
- रविवार: २०ता. सकाळी, ७ ते ५वा. पालखी मिरवणूक नानेमाची व नानेमाची आवाड, रात्री शेवते येथे वस्ती,
- सोमवार: दि. २१ता. शेवते येथे पालखी मिरवणूक, रात्री आंब्याचा माळ येथे वस्ती,
- मंगळवार दि: २२ता. आंब्याचा माळ येथे मिरवणूक व रात्री खरकवाडी येथे वस्ती,
- बुधवार: २३ता. खरकवाडी येथे पालखी मिरवणूक, त्यानंतर रोहिदासवाडी येथे पालखी मिरवणूक व शेदुरमळई रेथे वस्ती. गुरुवार २४ ता. शेदुरमळई येथे पालखी मिरवणूक, नंतर नारायण वाडी येथुन प्रस्थान व नांद्रुकवाडी येथे वस्ती.
- शुक्रवार: २५ ता. नांद्रुकवाडी येथे पालखी मिरवणूक, पेडामकरवाडी पालखी मिरवणूक नंतर शिवाजी नगर येथे पालखी मिरवणूक व वस्ती.
- शनिवार: २६ ता. रोजी सकाळी देवी गादीवर पालखी विसर्जन होणार आहे.
या सोहळ्यासाठी श्री सोमजाई देवस्थानचे कार्यकारणी सदस्य संजय गंगाराम कदम (अध्यक्ष) प्रकाश चंद्रु दरेकर (उपाध्यक्ष), श्रीरंग भागोजी भोसले (सचिव) अमोल भाऊ जाधव (खजिनदार) तसेच विश्वस्त मोहन रामचंद्र म्हामुणकर, प्रदीप रघुनाथ म्हामुणकर, प्रभाकर दिनकर कदम, दिपक यशवंत कदम, गणपत विठोबा सालेकर, सदाशिव दगडु मोरे, रोहिदास रामा जाधव, बबन शिवराम मोरे, सुरेश मोतीराम म्हामुणकर, द्वारकानाथ जाधव सर (सरपंच) यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन आहे.