Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगार आझाद मैदानात!

March 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
mathadi kamgar protest 1

मुक्तपीठ टीम

माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या कामगार, गृह, पणन व सहकार आणि अन्य खात्याअंतर्गत असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन च्या वतीने आझाद मैदान मुंबई येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे धरणे आंदोलन आयोजित केले होते माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या धरणे व उपोषण आंदोलनात युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील इतर पदाधिकारी आणि बृहन्मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, लातूर, सातारा, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील व्यवसायात काम करणारे हजारो प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनाचे विविध खात्यांतर्गत प्रलंबित असलेल्या प्रश्नांची माहिती देताना माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सांगितले की वर्षानुवर्षे या प्रश्नांची निवेदने सरकारकडे सादर केली बैठका झाल्या परंतु प्रलंबित प्रश्नांची सरकारने सोडून केलेली नाही त्यामुळे आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे, माथाडी मंडळात पुर्णवेळ चेअरमन/सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे, बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे, कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आवार व अन्य ठिकाणी मालाचे वजन 50 किलो ठेवण्याबद्दलची अंमलबजावणी होणे, शासनाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणा-या फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा मालावरील नियमण काढण्याचा दि.05 जुलै, 2016 चा शासन अध्यादेश रद्द होणे, नाशिक जिल्ह्यातील माथाडी/मापारी-तोलणार कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणुक होणे, माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतुद करणे व माथाडी कामगारांवर गुंडगिरी करणा-यांचा पोलीस यंत्रणेमार्फत बंदोबस्त करण्यासाठी समिती गठीत करणे, वर्क ऑडर्रच्या नांवाखाली माथाडी कामगारांची हक्काची कामे बळकावणा-या व कामगारांवर गुंडगिरी करणा-यांचा बंदोबस्त करणे, पिंपरी, पुणे येथिल मे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीकडील व अन्य माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे, गुलटेकडी मार्केट, पुणे येथिल कामगारांच्या टोळी पध्दतीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे, कळंबोली स्टील यार्ड व विविध रेल्वे यार्डातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे, कोल्हापूर रेल्वे यार्डातील कामगारांचे प्रश्न, ग्रेन डेपो- शिवडी येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे आदी प्रश्नांची सोडवणुक होण्याकरीता महाराष्ट्र शासनाचे संबंधित खात्याचे मंत्री महोदय, कामगार आयुक्त कार्यालय व संबंधितांकडे निवेदने सादर केली आहेत, परंतु या न्याय प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे संबंधितांनी लक्ष दिलेले नाही, त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून, कामगारांना आझाद मैदान, मुंबई येथे धरणे आंदोलन व आमरण उपोषण करणे भाग पडत असल्याचे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.
mathadi kamgar protest
माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सरकारने आता सोडून करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे अन्यथा आमदारांचा तीव्र आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा देखील दिला.
mathadi kamgar protest 1
माथाडी कामगारांच्या या धरणे आंदोलनास आमदार आशिष शेलार,शिवाजीराव पाटील-निलंगेकर, आमदार निरंजन डावखरे,अभिमन्यू पवार,मदन येरावत आदींनी भेट व पाठींबा दिला.

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाला का बसला धक्का? “नैतिकतेचं एवढं पतन…विचारच केला नव्हता!”

Next Post

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सिंचन योजनांच्या तक्रारींची महिनाभरात चौकशी पूर्ण करुन दोषींवर कारवाई करणार

Next Post
Shankarrao gadak

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सिंचन योजनांच्या तक्रारींची महिनाभरात चौकशी पूर्ण करुन दोषींवर कारवाई करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!