Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंगणवाडी सेविकांसाठी अर्थसंकल्प निरर्थकच! आझाद मैदानात उसळला संताप!!

March 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
AnganWadi employees protest

मुक्तपीठ टीम

नुकताच राज्य सरकारकडून राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. मात्र या अर्थसंकल्पात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पत्रदरात काहीच पडलेले नाही. मोबाईल देण्याची घोषणा वगळता त्यांच्या वाटेला काहीच आलेले नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. मानधन वाढीची जी बातमी देण्यात आली ती चुकीची होती असे सांगण्यात आले. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संतापले असून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मंगळवारी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढला. यावेळी हजारोंच्या संख्येने कर्मचारी सहभागी झाल्या असून त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.

 

आंदोलनात हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग…

  • गेल्या काही महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी सातत्याने आंदोलन करत आहेत.
  • २३ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले.
  • महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव कुंदन यांनी शिष्टमंडळाला भेट दिली व अनेक आश्वासने दिली होती.
  • तीन दिवसांचे आंदोलन त्यांच्या आश्वासनामुळे पहिल्याच दिवशी मागे घेतले गेले.
  • त्यानंतर सर्वजण अर्थसंकल्पाकडे डोळे लावून होते. मात्र त्यातही या कर्मचाऱ्यांची घोर निराशा करण्यात आली आहे.
  • या एकंदर पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची ऑनलाइन बैठक घेण्यात आली.
  • या बैठकीतच १५ मार्च रोजी आझाद मैदानावर संताप मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तरी राज्यातील हजारोच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावरील या आंदोलनात उपस्थित राहिल्या.

 

सायंकाळी उशिरापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे…

  • केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून राज्य सरकारने देखील त्याचीच पुनरावृत्ती केली असल्याचे मत समितीने व्यक्त केले आहे.
  • महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी शिष्टमंडळाला भेट न दिल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे चालू ठेवले.
  • व भेट मिळेपर्यंत धरणे चालू ठेवण्याचा निर्धार केला.
  • या आंदोलनात कृती समितीचे शुभा शमीम, बृजपाल सिंग, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, सुवर्णा तळेकर, आदींसह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.

 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या

  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या.
  • नवीन मोबाईल द्या.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करा.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन योजना लागू करा.
  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १०० टक्के मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप देण्यात यावे.
  • लाभार्थ्यांना चांगला पूरक पोषण आहार मिळावा.
  • किरकोळ खर्चासाठीच्या रकमेत वाढ करावी.
  • रिक्त जागांवर भरती व पदोन्नती करावी.

Tags: AnganWadiMaharashtraYashomati Thakurकेंद्र सरकारमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीयशोमती ठाकुर
Previous Post

काश्मिर फाइल्स ते काश्मिर अर्थसंकल्प! “मोदी सरकारनं काश्मिरी पंडितांसाठी केलं काय?” – सुप्रिया सुळे

Next Post

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ

Next Post
Extension to the first National Voter Awareness Competition

पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!