मुक्तपीठ टीम
युद्धाचे वार्तांकन करताना अनेक पत्रकारांना जीव धोक्यात टाकून वार्तांकन करावे लागते आणि कधी कधी त्यात त्यांचा जीवही जातो. रशिया-युक्रेनमध्ये गेल्या २१ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि अनेक सामान्य माणसांना जीव गमवावा लागला आहे. सोमवारी, युक्रेनमध्ये कव्हरेज दरम्यान झालेल्या हल्ल्यात अमेरिकन फॉक्स न्यूज चॅनलचा कॅमेरामन पिअरे झक्रझेवस्की मारला गेला आहे तर पत्रकारही जखमी झाला आहे. फॉक्स न्यूजच्या सीईओ सुसान स्कॉट यांनी मंगळवारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना ही माहिती दिली. ते ५५ वर्षांचे होते.
कसा झाला हल्ला?
पिअरे झक्रझेवस्की युक्रेनची राजधानी कीव्हच्या बाहेर होरेन्कामध्ये वार्ताहर बेंजामिन हॉलसोबत बातमी देत होते तेव्हा त्यांच्या वाहनावर हल्ला झाला. वार्ताहर बेंजामिन हॉल या हल्ल्यात जखमी झाला असून त्याला युक्रेनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात पिअरे झक्रझेवस्की मृत्यू झाला.
इराक ते अफगाणिस्तान आणि सीरियापर्यंत झक्रझेवस्की केले होते युद्ध कव्हर
फॉक्स न्यूजच्या सीईओ सुझान स्कॉट यांनी सांगितले की, “पिअरे हे वॉर झोन फोटोग्राफर होते ज्यांनी फॉक्स न्यूजसाठी इराक ते अफगाणिस्तान आणि सीरियापर्यंत आपल्या दीर्घ कार्यकाळात जवळपास प्रत्येक आंतरराष्ट्रीय कथा कव्हर केल्या होत्या. त्यांची जिद्द आणि प्रतिभा अतुलनीय होती.”
झक्रझेवस्की होते लोकप्रिय…
- स्कॉट यांनी स्पष्ट केले, “लंडनमध्ये राहणारे, पिअरे फेब्रुवारीपासून युक्रेनमध्ये युद्धाचे कव्हरेज घेत होते. त्यांची प्रतिभा अफाट होती.
- फोटोग्राफीपासून ते अभियंता आणि संपादकापर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी उत्कृष्ट काम केले.
- कथा सांगण्यासाठी ते पूर्णपणे वचनबद्ध होते आणि त्यांचे शौर्य, व्यावसायिकता आणि कार्य नैतिकता प्रत्येक मीडिया आउटलेटवर पत्रकारांमध्ये प्रसिद्ध होती.
- ते कमालीचे लोकप्रिय होते – मीडिया उद्योगातील प्रत्येकजण ज्याने परदेशी कथा कव्हर केली आहे ते पिअरेला ओळखत होते आणि त्यांचा आदर करतात.”