मुक्तपीठ टीम
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर टीका केलीच तसेच त्यांनी एक धक्कादायक विधानही केले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचे टार्गेट हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी यावेळी केला.
केंद्रीय तपास यंत्रणांसमोर शरद पवार हे टार्गेट
- केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत सूडबुद्धीने वागतात.
- त्यांना टार्गेट दिले आहेत.
- हे तुमचे टार्गेट आहेत.
- तुम्ही या टार्गेटवर हल्ले करत राहा.
- त्यानुसार केंद्रीय तपास यंत्रणा काम करतात.
- विरोधी पक्षातले टार्गेट आहेत.
- या देशात असं कधी घडलं नाही.
- शरद पवार हे त्यांचे टार्गेट आहे.
- त्यांना बदनाम केले जात आहे.
- त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात आहे.
- ही कालची पोरं, काल पक्षात आलेले लोक हे पवारांविषयी ज्या भाषेत बोलतात, हे फडणवीस, नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांना तरी मान्य आहे का? जर मान्य नसेल तर, त्यांनी महाराष्ट्राचे पुढारी म्हणून त्याचे खंडन केले पाहिजे.
- तसेच निषेध केला पाहिजे.
- राजकीय मतभेद असू शकतात.
- पण ज्या पद्धतीची भाषा महाराष्ट्रात पवार यांच्यासारख्या उत्तुंग नेतृत्वाविषयी वापरली जाते, ते योग्य नाही.
- महाराष्ट्रात अशा लोकांचा सन्मान ठेवायला हवा, ज्यांनी महाराष्ट्र घडवण्यात योगदान दिलं.
- त्यांच्याविषयी कोणती भाषा भाजपची लोकं वापरत आहेत?
विरोधी पक्ष राहणे ही देशाची आणि लोकशाहीची गरज!
- संजय राऊत यांनी आज, सोमवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.
- यावेळी राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले.
- निवडणुका आल्या की, अनेक मुद्दे आधी जिवंत केले जातात आणि निवडणुकांना ‘काश्मीरपासून पाकिस्तानपर्यंत…’ एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो.
- अलीकडच्या काळात विकासापेक्षा धार्मिक मुद्द्यांवर भर दिला जात असल्याचे दिसते.
- निवडणुका या त्यावरच लढवल्या जात आहेत.
- पाच वर्षांत पुन्हा त्याच जुन्या मुद्द्यांवर येतात.
- आता लोकांना सवय झाली आहे.
- लोकं सुद्धा त्यासोबत वाहून जात आहेत.
- चार राज्यांतील निवडणुकांमध्ये भाजपा, तर एका राज्यात आम आदमी पक्ष जिंकला आहे.
- विजयाचा उन्माद नको, अजीर्ण होऊ नये, तो सत्कारणी लावावा.
- विरोधी पक्ष राहणे ही देशाची आणि लोकशाहीची गरज आहे.
मोदींचे नेतृत्व देशात सगळ्यात उंच!
- देशाचे पंतप्रधान हे कोणत्या एका पक्षाचे नसतात.
- हे या भाजपाच्या नेत्यांना समजायला हवं.
- मोदी यांचे नेतृत्व देशात सगळ्यात उंच आहे हे गेली अनेक वर्षे सांगतो.
- पण मोदी फक्त आमच्या पक्षाचे, गटाचे आहेत, अशा प्रकारचे वातावरण भाजपाचे लोक निर्माण करत आहेत.
ते देशाचे नेतृत्व करतात. - दुर्दैवाने त्यांची भाषणे ऐकली तर, या चक्रातून त्यांनी बाहेर पडले पाहिजे.
- महाराष्ट्रातील काही नेते आहेत, त्यांनाही ते समजायला हवे.
- काही लोकांना मोठेपण मिळाले असेल तर, ते टिकवता येत नाही.
राऊतांकडून फडणवीसांना प्रत्युत्तर…
- देवेंद्र फडणवीस यांना विजयाचे शिल्पकार म्हटले जात आहे, या प्रश्नावर राऊत यांनी उत्तर दिलं.
- ‘विजयाच्या शिल्पकाराला नोटीस येऊ नये, असं कुठं म्हटलंय.
- नोटिसा आम्हालाही येतात.
- पण आम्ही तमाशे केले नाहीत.