Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नागपूरची गुन्हेगारी रोखण्यासाठी थेट पोलीस आयुक्त मैदानात

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
nagpur police

मुक्तपीठ टीम

 

भाजपानंतर महाविकास आघाडी सत्तेतही नागपूर हे राज्याच्या गृहमंत्र्यांचे शहर आहे. पण नागपूर की क्राइमपूर असा प्रश्न विचारावा अशी गुन्हेगारी तेथे असते. त्यामुळेच नागपुर पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी थेट मैदानात उतरले आहेत.

 

नागपूरमधील गुन्हेगारांना कुणाचाच वचक नसतो असे चित्र नेहमीच दिसते. गेल्या काही दिवसांमध्ये तेथे रक्तरंजित गुन्हेगारी वाढू लागली. गुन्हेगारीमध्ये वाढ झाल्याची गंभीर दखल पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी घेतली. आता ते नियमितपणे पोलीस ठाण्यांना भेट देत आहेत. त्यांनी नुकतीच कळमना आणि यशोधरा नगर पोलिस ठाण्यांना भेट दिली.  यावेळी त्यांनी पोलिसांकडून केलेल्या गुन्हेगारी नियंत्रण उपायांचा आढावा घेतला.

 

नारायणपेठमधील विजय वाघधारे यांच्या हत्येनंतर कुमार यांनी शांती नगर पोलिस ठाण्यात भेट दिली. जबाबदारी निश्चित करण्यासाठी अतिरिक्त पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशीचे आदेश त्यांनी दिले.

 

अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूक्ष्म स्तरावर पोलिसिंगसाठी ‘बीट पेट्रोलिंग’ यंत्रणा बळकट केली जाईल. या आठवड्याच्या सुरूवातीला कुमार यांनी गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. गुन्हेगार, त्यांची गुन्हेपद्धती, एकंदरीत गुन्हेगारी आणि ती नियंत्रणात आणण्याच्या रणनितीवर खूप विचारविमर्श करण्यात आला. शहरात अंमलबजावणीसाठी विभागीय उप-पोलिस आयुक्तांसोबत विशिष्ट रणनीतीवरही चर्चा करण्यात आली. पोलीस आयुक्तांनीच मनावर घेतले असल्याने आता तरी नागपूर की क्राइमपूर असा प्रश्न विचारण्याची वेळ येऊ नये, असं वाटतं.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Amitesh KumarNarayanpethअमितेश कुमारनागपूर पोलीसनारायणपेठपोलिस आयुक्तभाजपमहाविकास आघाडी
Previous Post

झेडपी शाळेच्या शिक्षिकेची कमाल, गावच्या मुलांना जपानीचे धडे

Next Post

जगातील सर्वात जुनं जीवाश्म भारतात, भीमबेटकाच्या गुहेत सापडलं

Next Post
bhimbetka

जगातील सर्वात जुनं जीवाश्म भारतात, भीमबेटकाच्या गुहेत सापडलं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!