मुक्तपीठ टीम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात अजित पवार म्हणालेत की, “नोटीस देण्याची पद्धत राज्यात नव्हती. पण जबाबदार व्यक्तीनेही बोलताना भान बाळगले पाहिजे.”
अजित पवार यांनी पुण्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करणे सुरू केले आहे. यावेळी ते मीडियाशी बोलताना म्हणालेत की, जनतेला राजकारण्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपात अजिबात रस नाही. त्यांना विकास हवा आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस पाठवल्यामुळे, भाजपाने म्हटले की, गुन्ह्याची चौकशी करण्याऐवजी सरकार गुन्हे उघड करण्यारांवर कारवाई करते. गुन्हे उघड करणाऱ्यांना भीती घालते. “नोटीसा देण्याची परिस्थिती कधीही नव्हती. या संदर्भात वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करणे योग्य नाही. मी पंतप्रधानांसमोर याबाबत थोडेबहुत विधान केले होते. प्रत्येकाने आपआपली कामे करावी. जनतेने ज्यांना पाठिंबा दिला आहे, लोकशाहीत जनता ज्यांच्या पाठिशी असेल त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करावे असे माझे मत आहे.” असे अजित पवार म्हणाले.