मुक्तपीठ टीम
भारतीय सैन्यात शॉर्ट सर्विस कमीशन (टेक)-५९ अॅंड एसएससीडब्ल्यू (टेक)-३० या पदावर १८४ जागा, संरक्षण कर्मचारी असणाऱ्यांच्या विधवा महिलांसाठी शॉर्ट सर्विस कमीशन (नॉन-टेक) (नॉन-यूपीएससी) या पदावर ०१ जागा आणि शॉर्ट सर्विस कमीशन (टेक) या पदावर ०१ जागा आहेत. जवळजवळ अशा एकूण १९१ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. ही भरतीसाठी संपूर्ण भारतात संधी आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- शॉर्ट सर्विस कमीशन (टेक)- ५८ आणि एसएससीडब्ल्यू (टेक)-३० – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षातील लोक
- एसएससी (विधवा महिला) (नॉन टेक) (यूपीएससी नसलेले)- कोणत्याही प्रकारची पदवी
- शॉर्ट सर्विस कमीशन (विधवा) (टेक)- बी.ई/ बी.टेक असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
शॉर्ट सर्विस कमीशन (टेक)- ५८ आणि एसएससीडब्ल्यू (टेक)-३० या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षांपर्यंत असणे आवश्यक असावे तर, संरक्षण कर्मचारी असणाऱ्यांच्या विधवा महिलांचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट https://www.indianarmy.nic.in/home वरून माहिती मिळवू शकता.