मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशसह चार राज्यात मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांकडून जल्लोष साजरा करताना दिसला. भाजपाचे बडे नेते यावेळी नाचताना, फुगडी घातलाना दिसले. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात विजय मिळाल्याने त्यांचे मुंबईत भाजपाकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संवाद साधताना त्यांनी मुंबई मनपा जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
सामान्य माणसाच्या मनात एकच नेते पंतप्रधान मोदी…
- आम्हाला सगळ्यांना चार राज्यातील विजयाचा मनापासून आनंद झाला आहे.
- या निवडणुकीने सिद्ध केले की, सामान्य माणसाच्या, कष्टकरांच्या मनात अजूनही एकच नेते आहेत.
- ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
- मोदीजींच्या नेतृत्वात भाजपने चार राज्यांमध्ये विजय मिळवला.
- देशातले सर्वात मोठे २५ कोटी लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेशचाही समावेश आहे.
- उत्तर प्रदेशमधूनच लोकसभेचा आणि दिल्लीचा रस्ता जातो.
- ३७ वर्षांत पहिल्यांदा एका पक्षाने सलग उत्तर प्रदेश जिंकल्याचा पराक्रम केला.
मोदी है तो मुमकीन है …
- चार राज्यातील निवडणुकानंतर संपूर्ण देशाने मोदींची जादू अनुभवली.
- मोदी है तो मुमकीन है पाहायला मिळालं.
- मोदींनी सामान्य माणसाच्या मनात जो विश्वास निर्माण केला.
- मोदी आपल्यासाठी कधीही आहे.
- मोदी मरू देणार नाहीत, उपाशी राहू देणार नाहीत, बेरोजगार राहू देणार नाहीत, हा लोकांना वाटणारा विश्वास मतांमध्ये परिवर्तीत झाला.
- गोव्यात काँग्रेसने राज्यपालांना आधीच सरकार स्थापनेसाठीचं पत्रं दिलं होतं.
- पण दुसऱ्या दिवशी चिटपाखरूही राजभवनावर गेलं नाही.
- इतकी वाईट अवस्था काँग्रेसची झाली आहे.
शिवसेनेने मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना हरवणार असल्याच्या वल्गना केल्या…
- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या मतदारसंघात जाऊन शिवसेनेने गर्जना केली होती.
- सावंतंना हरवणार असल्याच्या वल्गना केल्या होत्या.
- सेनेचे सर्व नेते तिथे गेले, प्रचार केला.
- पण शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त ९७ मते मिळाली.
- हा कौल भाजपाचा आहे, मोदींचा आहे., विश्वासाचा आहे.
- सामान्य जनतेचा आहे.
- मी केवळ प्रतिनिधी म्हणून गेलो.
- विजय तर मोदी मिळवून देणार होते.
नोटांपेक्षाही कमी मतं राष्ट्रवादी आणि शिवसेनेला!
- महाराष्ट्रातील आमदार, खासदार कार्यकर्त्यांचं आभार.
- चंद्रकांतदादा तुम्ही महाराष्ट्रातून सेना पाठवली, त्या सेनेचा गोव्याच्या विजयात हात आहे.
- सेना म्हणजे भाजपाची सेना.
- दुसऱ्या सेनेचं काय झालं ते पाहिलं असेल.
- त्यांनी भाजपाला हरवणार अशी गर्जना त्यांनी केली होती.
- त्यांची लढाई आमच्याशी नाही नोटाशी होती हे मी सांगत होतो.
- राष्ट्रवादी आणि सेनेची मते एकत्र केली तरी नोटांची मते जास्त आहेत.
अभी तो असली लढाई मुंबई में होगी…
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे.
- कोणत्याही लढाईने होरपळून जाऊ नका.
- विजयाने हुरळून जायचं नाही, विजयाने नम्र व्हायचं आहे.
- विजयाने अधिक मेहनत करायची आहे.
- अभी तो असली लढाई मुंबई में होगी.
- आम्हाला मुंबईला कोणत्याही पक्षापासून मुक्त करायचे नाही.
- आम्हाला मुंबईला भ्रष्टाचारापासून मुक्त करायचे आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात उतरलो आहोत.
- जोपर्यंत भ्रष्टाचाराच्या विळख्यातून या मुंबईला बाहेर काढत नाही तोपर्यंत दम घेता येणार नाही.
- म्हणून हा विजय आज साजरा करा.
- उद्यापासून कामाला लागा.
- पुन्हा एकदा मुंबईत प्रचंड विजय आणि भाजपाचं महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार बनविण्यासाठी सज्ज व्हा!
केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्राचा विकास…
- केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्र नेहमीच राहिला आहे. कोरोना काळात सर्वाधिक निधी, पीपीई किट महाराष्ट्राला मिळाले.
- केंद्राच्या अजेंड्यावर महाराष्ट्राचा विकास आहेच.
- आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ असून, २०२४ मध्ये भाजपाचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, असा दावा फडणवीस यांनी केला.
- शिवाय मोदींनी बेकायदेशीर काम करणाऱ्यांना इशारा दिल्याचेही ते म्हणाले.