Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अर्थसंकल्पात स्वतंत्र बजेटच्या तरतुदी करिता आंबेडकरी संघटना आक्रमक

आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन सुरु

March 8, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Ambedkarite organization agitation started at Azad Maidan Mumbai

मुक्तपीठ टीम

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्यावर अनुसूचित जातीचा निधीचा अपहार करणे, पैसे वळविणे, भ्रष्टाचार आदी बाबत गुन्हा दाखल करावा. निती आयोग यांच्या मार्गदर्शक धोरणानुसार अनुसूचित जाती, जमाती यांच्या लोकसंख्येनुसार राज्यातील चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वतंत्र बजेट मंजूर करावे, अनुसूचित जाती करिता ७० हजार कोटी, तर अनुसूचित जमाती करिता ३५ हजार कोटी रुपये मंजूर करावे, कर्नाटक राज्याने अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र न वळविण्याबाबत जो कायदा पारित केलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील असाच कायदा पारित करावा. उपवाटप, संसाधने, नियोजन आणि घटक योजनेचा आराखडा तयार करावा. टार्गेटेड स्कीम विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सवलती करिता भरगोस निधीची तरतूद करावी.

 

महागाई निर्देशांकानुसार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, फ्रीशिप इतर योजनामध्ये वाढ करण्यात यावी, शिष्यवृत्ती करिता उत्पन्न मर्यादा ही २.५ लाखावरून ८ लाख करण्यात यावी, बार्टी मार्फत भीमा कोरेगाव इव्हेंट प्रकरणी बील मंजुरीसाठी पार्टी घेणे तसेच जातीचे प्रमाणपत्र, व्हॅलेडीटी यामधील होणारा भ्रष्टाचारबाबत कायदेशीर कारवाई व्हावी, सामाजिक न्याय विभागाचा अखर्चित निधी मार्च अखेर खर्च करण्यात यावा. पीजी कोर्सेसकरिता फ्रीशिप सवलतीमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी अभ्यासक्रमाचा समाविष्ट करावा. मागासवर्गीय बेरोजगार व्यक्तीला शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार बिनव्याजी अर्थसहाय्य करावे.

 

 

राज्यातील बार्टी समता दूत, प्रकल्प संचालक, नोडल ऑफिसर आधी तात्काळ बरखास्त करावी व स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली ३० प्रशिक्षण संस्थाना विना निविदा कोट्यावधी रुपये देणे या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, शासकीय तंत्रनिकेतन तासगाव येथील सीएचबी भरती मध्ये गैरकारभाराबाबत गुन्हा दाखल करावा, डॉ. आंबेडकर विशेष अनुदान योजना अंतर्गत अजूनही निधी देण्यात आलेला नाही, भिमा कोरेगाव करिता बार्टीचे १०० कोटी तर ८७५ कोटी कामठी येथील हॉस्पिटल करिता वळविण्यात आले आहे हा निर्णय मागे घ्यावा, सामाजिक न्याय विभागाने व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे. संजय गांधी निराधार योजना, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, रमाई घरकुल योजना मधील जाचक अटी रद्द करा.

 

 

दि. ०८ मार्च पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनात रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे संघटना प्रमुख अमोल वेटम, जनसंघर्ष क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संतोष आठवले, अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समिती अध्यक्ष दादासाहेब यादव, भिमयान फौंडेशन प्रमुख अमित वाघवेकर, जीवन भालेराव आदी उपस्थित होते.


Tags: mumbaiRepublican Students Unionअमोल वेटमआझाद मैदानमुंबईरिपब्लिकन स्टुडंट्स युनियन
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाचित्रपट हे नागराज मंजुळेंचं स्वप्न! कोरोनामुळे उशीर, पण पूर्ण करणारच!!

Next Post

शिवसेनेच्या राहुल कनाल, संजय कदमांवर आयकर धाडी! आशिष शेलार, अमीत साटमांच्या मतदारसंघातील आदित्य ठाकरे आणि अनिल परबांचे निकटवर्तीय लक्ष्य!

Next Post
IT Raid at Shivsena leaders house

शिवसेनेच्या राहुल कनाल, संजय कदमांवर आयकर धाडी! आशिष शेलार, अमीत साटमांच्या मतदारसंघातील आदित्य ठाकरे आणि अनिल परबांचे निकटवर्तीय लक्ष्य!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!