मुक्तपीठ टीम
ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये मॅनेजर या पदासाठी ०१ जागा, सुपरिंटेंडिंग इंजिनीअर या पदासाठी ०२ जागा, सुपरिंटेंडिंग मेडिकल ऑफिसर या पदासाठी ०२ जागा, सिनियर मेडिकल ऑफिसर या पदासाठी ०१ जागा, सिनियर सिक्योरिटी ऑफिसर या पदासाठी ०१ जागा, सिनियर ऑफिसर या पदासाठी ४३ जागा, सिनियर अकाउंट्स ऑफिसर/ सिनियर इंटरनल ऑडिट या पदासाठी ०५ जागा अशा एकूण ५५ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) ६५% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी २) एसएपी एचसीएम प्रमाणपत्र ३) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.२- १) ६५% गुणांसह पर्यावरण इंजिनीअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी+पर्यावरण इंजिनीअरिंग पदवी २) ०३ वर्षे अनुभव
- पद क्र.३- एमडी/ डीएनबी
- पद क्र.४- १) एमबीबीएस २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.५- १) कोणत्याही शाखेतील पदवी २) ०२ वर्षे अनुभव
- पद क्र.६- ६०% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल इंजिनीअरिंग पदवी किंवा मास कम्युनिकेशन/ पब्लिक रिलेशन्स/ सोशल वर्क/ रूरल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी/ एमबीए
- पद क्र.७- आयसीएआय/ आयसीएमएआयचे सहयोगी सदस्य असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय जास्तीत जास्त ३७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईडब्ल्यूएस/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी ऑइल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.oil-india.com/ वरून माहिती मिळवू शकता.