मुक्तपीठ टीम
दिशा सालियन मृत्यूबद्दल वादग्रस्त विधानांमुळे महिला आयोगाच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे चौकशीसाठी त्या पोलीस ठाण्यात गेले होते. तब्बल ९ तासांच्या चौकशी नंतर राणे पिता-पुत्रांना पोलिसांनी सोडले. पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना, “केंद्रीय मंत्री, आमदार असूनही बसवून ठेवलं होतं. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोललो, त्यांनी एक फोन केला, मग आमचा जबाब नोंदवला,” असं सांगितलं.
दिशा सालियनबद्दल बोलल्यामुळेच दबावाखाली गुन्हा
- मला दोन दिवसांपूर्वी 41A ची नोटीस आली होती, आपलं म्हणणं सागण्यासाठी यावे अशी नोटीस होती.
- त्यात असे म्हटले होते की, दिशा सालियानच्या आईने तक्रार केली असल्याने तुम्हाला यावं लागेल.
- मी आणि नितेश काय बोललो, तिची आत्महत्या नाही हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत आहोत.
- त्यानंतर मुंबईच्या महापौरांनी त्यांच्या कुटुंबियांना तक्रार करायला भाग पाडलं.
- आमची बदनामी होतेय, अशी तक्रार केली. खोटी तक्रार केली.
- पोलीस स्टेशनने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. मागील ९ तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो.”
- मी सांगतोय वारंवार की मी केंद्रीयमंत्री आहे, नितेश राणे आमदार आहेत.
- आम्हाला अधिकार आहे कोणावर अन्याय होत असेल, दिशा सालियानवर अन्याय झाला.
- तिला न्याय मिळावा अशी आमची मागणी असातनाही आमच्यावर केस करण्यात आली.
- आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे.
- पण याबाबत मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार.
- शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर आम्हा दोघांनाही आमचे स्टेटमेंट पूर्ण झाल्यानंतर बाहेर सोडलेलं आहे
नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंबद्दल गौप्यस्फोट
- सुशांतची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला.
- सुशांतच्या केसबद्दल आणि एका मंत्र्याची गाडी होती या बद्दल बोलू नका.
- तुम्हालाही मुले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
- मात्र पोलिसांनी माझं हे वाक्य जबाबातून वगळलं.
- मात्र आम्ही अन्यायाविरुद्ध लढत राहणार.