मुक्तपीठ टीम
मुंबईजवळील वसईमध्ये एका ज्वेलर्सला हनी ट्रॅपमध्ये अडकून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही महिलांनी ज्वेलर्सला आपल्या जाळ्यात अडकवले होते, पण ज्वेलर्सने या दोन्ही महिलांना कायमचा चांगलाच धडा शिकवला.
वसई येथील एक ज्वेलर्सच्या दुकानात दागिणे गहाण ठेवण्याच्या बहाण्याने मुख्य आरोपी प्राजक्ता पाटील ही आली होती. यावेळी प्राजक्ता पाटीलने ज्वेलरशी बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी ज्वेलरला आपल्या घरी बोलावले होते. यावेळी या महिलेने त्याच्याशी जवळीक साधली. त्यानंतर शेजारच्या खोलीतून आरोपी ज्योती उपाध्यायसह दुसरा एका पुरुष आरोपी आला. त्यांनी त्याच्या जवळीकीचा व्हिडीओ बनवल्याचे सांगितले.
त्यानंतर ज्वेलरला तो व्हिडीओ दाखवून पैसे देण्यास धमकावण्यात आले. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. पैसे दिले नाहीतर हा व्हिडीओ तुझ्या कुटु्ंबीयांना दाखवला जाईल, सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला जाईल, अशी धमकी दिली. अखेर ज्वेलरने ऑनलाईन साडेचार हजार रुपये दिले. तसंच आरोपींनी त्याच्याकडून दागिनेही हिसकावून घेतले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपींनी ज्वेलरला वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. अखेर ज्वेलरने हिंमत करून वालाव पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींच्या घरावर छापा टाकून आरोपी महिला प्राजक्ता पाटील आणि ज्योती उपाध्याय या दोघींना अटक केली. परंतु, यादरम्यान त्यांचा पुरुष साथीदार आरोपी घटनास्थळावरून पळाला. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४ ४, ४ ३६४(अ), ४ ३८४ आणि ५ ३८५ (खंडणी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या महिलांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हनी ट्रॅप म्हणजे काय?
- एखाद्या पुरुष सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी सुंदर स्त्रीचा आमिषासारखा वापर केला जातो, त्याला हनी ट्रॅप म्हणतात.
- हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या अधिकारी, प्रभावशाली, श्रीमंत पुरुषांना सदर महिलेकडून गोडीगुलाबीने चलाखीने माहितीसाठी वापरून घेतले जाते
- काहीवेळा पुरुष सहकार्य करत नाहीत तेव्हा मात्र हनी ट्रॅप कटानुसार घडवलेल्या संबंधांचे व्हिडीओ ब्लॅकमेल करण्यासाठी वापरले जातात. इप्सित साध्य केले जाते.
- जागतिक पातळीवर लष्करी हेरगिरी, कॉर्पोरेट हेरगिरी, राजकीय हेरगिरी यात हनी ट्रॅपचा शस्त्रासारखा वापर केला जातो.
- भारतातही राजकीय नेत्यांचे करिअर संपवण्यासाठी किंवा निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर करतात