मुक्तपीठ टीम
शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांकडून शिक्षण अधिकार कायद्याचे पालन केल्याशिवाय चालणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई केली जात नाही. तसे न करणे व अशा शाळा प्रशासनाकडून द्रव्यदंड वसूल न करता शासनाचे महसूल डुबवणे याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाची तक्रार करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे प्रसाद तुळसकर व नितीन दळवी यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग व विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या २२३ खाजगी शाळा विनमान्यता सुरु आहेत असे महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाचे प्रसाद तुळसकर व नितीन दळवी यांच्या निदर्शनास आले व शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी , शिक्षण निरीक्षक यांना दिनांक ०५/०१/२०२२ रोजी पाठविलेल्या पत्रानुसार राज्यात RTE मान्यते शिवाय चालणाऱ्या ६७४ खाजगी शाळा कार्यरत असल्याचे निदर्शनास येते. मुंबईच्या शाळांचा अधिकृत आकडा २२३ असला तरी त्याची संख्या जास्त असण्याची शंका आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक खाजगी शाळा प्रशासनाला शासनाकडून आर टी ई मान्यता घेणे बंधनकारक असते व तसे न केल्यास विना मान्यता शाळा चालविल्यास शाळा प्रशासनावर रु १ लाख द्रव्यदंड आणि ज्या कालावधीत असे उल्लंघन करण्याचे चालू ठेवले असेल त्या कालावधीत प्रत्येक दिवसागणिक रु १० हजार पर्यंत द्रव्यदंड वसूल करायचा असतो. मुंबई विभागातील अश्या बेकायदा शाळां वर कारवाई करण्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाकडे असते.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक खाजगी शाळेस गरीब मुलांना २५% जागा राखीव ठेवायच्या असतात , पण गरीब मुलांना शिक्षण देणे हे खाजगी शाळांना तोट्याचे वाटते म्हणून बऱ्याच नामांकित खाजगी शाळा विना RTE मान्यता वर्षानुवर्षे चालवतात व अश्या शाळांवर बृहनमुंबई महानगर पालिका शिक्षण विभागातील अधिकारी कारवाई करत नाहीत व शासनाला दंडापोटी मिळणारी कोट्यवधींची रक्कम डुबवतात, हा एक मोठा भ्रष्टाचाराचा भाग असल्याचे मा. शिक्षण मंत्र्यांना केलेल्या तक्रारीत महासंघाने नमूद केले आहे, व काही बड्या शाळांचे पुरावे देखील सादर केले आहेत.
अश्या मोठ्या व बड्या शाळांच्या मान्यतेविषयी पालकांनी माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागितल्यास बृहनमुंबई महानगर पालिका शिक्षण विभागातील अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करतात व दिशाभूल करणारी माहिती देतात हा एक मोठा भ्रष्टाचारच आहे याचे पुरावे देखील तक्रारी सोबत महासंघाने दिले आहेत.
मुंबईतील एका नामांकित संस्थेद्वारे अनेक प्राथमिक खासगी शाळा विना आर. टि. इ. मान्यता चालविल्या जातात व अश्या शाळांची तक्रार करून ही बृहनमुंबई महानगर पालिका शिक्षण विभागातील अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक (मुंबई) हे शाळा प्रशासनावर कारवाई करत नाही याचे पुरावेही तक्रारी द्वारे महासंघाने दिले आहेत.
सर्व खाजगी बेकायदा शाळा प्रशासनावर कारवाई करून बृहनमुंबई महानगर पालिका शिक्षण विभागाने कोट्यवधी मध्ये जाणारा द्रव्यदंड वसूल करावा व यापूर्वी ज्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी कारवाई केली नसेल अश्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार केल्या प्रकारणी व शासनाचे द्रव्यदंडापोटी मिळणारे महसूल डुबवल्याबाबत कारवाई करावी अशी मागणी महासंघाच्या प्रसाद तुळसकर व नितीन दळवी यांनी मा. शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे व शासन नियमाप्रमाणे योग्य कालावधीत कारवाई न केल्यास या सर्व भ्रष्टाचाराप्रकरणी शालेय शिक्षण विभाग व बृहनमुंबई महानगर पालिका शिक्षण विभागा विरुद्ध माननीय उच्च न्यालयात दाद मागण्यात येईल असा निर्वणीचा इशाराही महाराष्ट्र राज्य विद्यार्थी पालक शिक्षक महासंघाने दिला आहे.
Thorough enquiry to be done in this matter.
मा.तुळसकरसाहेब व दळवीसाहेबांचे हे अतिशय स्तुत्य उपक्रम व कार्य आहे नि त्यास आमचा पालक,विध्यार्थी, #भारतवर्षंकडून सलाम!👌💐
सरकारी तिजोरीपेक्षा,स्व-तिजोरी,स्व-कुटुंबहित, मोलाचं मानणाऱ्या अश्या आज #शिक्षणसम्राटांच्या हुकूमशाहीला,मनमानीला, खुद्द #सरकारी-निमसरकारी यंत्रणाच साथ देत असेल,नि कायद्याच,संविधानाचं उल्लंघनच वारंवार होऊनही,जर त्याविरुद्ध कोणीही ब्र काढत नसेल,आवाज उठवत नसेल,वा न्यायपालिकादेखील विकली गेली असेल,बघ्याची भूमिका घेत असेल, नि वृत्तपत्रात वा माध्यमात आलेली नोंद अत्यंत गांभिर्याने स्वतः हून घेत नसेल ; जी वास्तवात घ्यायलाच पाहिजे👌 ;ती घेत नसेल;तर आमच्या समान्यजनतेने, #मतदारराजा ने
#उघडाडोळेबघानीट आणि #जाणताराजा जागे व्हता तसे सर्वांनीच झाडून,जागून,पेटून उठले पाहिजे💐👌 आणि गीत गायले पाहिजे की;
उष:काल होता होता
काळरात्र झाली
आरे पुनः आयुष्याच्या पेटवा मशाली
अन…
कविवर्य केशवसुतांच्या आरोळीप्रमाणे
‘द्या मज कुणी एकच तुतारी ..
म्हणत आदरणीय ;
नितीन दळवी,तुळसकर,व जनार्दन जंगले (टी डी एफ-मुंबई शिक्षक लोकशाही आघाडी) वगैरेंच्या पाठीशी आज तन मन धन घेऊन काळाची गरज
( आज कोर्टात गेल्याशिवाय न्याय मुश्कील वा आंदोलन,सत्याग्रह सामूहिक👌 केल्याशिवाय शक्ती प्रदर्शनाशिवाय अशक्य!👌 आणि यासाठी लढ्याला स्वतः ची तज्ञ वकिली फौज असल्याशिवाय नि तारखेला सर्वांनी भूसंख्येनं कोर्टाच्या समोर हजर असल्याशिवाय कारण कोर्टाला कळू द्या की पब्लिकच किती संविधान नि न्यायपालिकेवर दडपण नि विश्वास आजही आहे नि तेवढंच जर ढासळत गेलं तर लोकशाहीच्या पोटात,संविधानाच्या हृदयात खंजिरच👌💐💐 मारल्यासारखं असून,आज खरोखर ह्या खांबाचा आधारही तुटत चाललाय!👌 उद्या #महासंग्राम
व्हायला वेळच नाही लागणार!👌 आणि आज #मुख्यराजनेता पळलेच पाहिजे!!👌 तरच हे होईल!👌 जोपर्यंत हे होणार नाही,त्यांना हलवून,जागे केल्याशिवाय हे अशक्य आहे!👌👌
आनि त्यांची पाळेमुळे खूप खूप खोलवर इतकी रुजलेत की ;
‘बिल्लीके गलेमें घंटी कौन बांधेगा?’
अशी अवस्था झाली असून,लबाड अधिक खालपासून वरपर्यंत गुंतल्यात 👌👌 ते
मूग गिळून बसल्यात 👌💐!
म्हणून त्यांची दलाली ही स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांची नुसती ‘
तोबा छुप्पी गर्दी ‘👌 असते त्यात;
तो पैसा cash ने देणारा Ed ला फसवणाराचा असतो! आणि म्हणून ; याविरुद्ध आवाज उठवणाऱ्याचा नि त्याच्या कुटुंबियांचाच जीव धोक्यात असतो,त्यांना प्रत्यक्षाप्रत्येक्ष कुठल्यातरी ‘ त्याची जात पात, धर्म,वंश,प्रांत वा त्याच कुठे लेखन आहे,कुठं वावर असतो,कोणत्या केसमध्ये तो अडकलाय,त्यात ते संपवण्याचाच प्रयत्न करत असतात,बदनाम करण्याचा टोलींचा सुळसुळाट फार असतो नि ते कळत न कळत गुंतवतात वा घातपात घडवून आणतात, #खोट्याकेसेस मध्ये असे अडकवतात की तो ; संपवलाच जातो👌💐 हे त्रिकालाबाधित सत्य असते!👌
म्हणून; या नि अश्या अन्याय ,अत्त्याचारविरुद्ध लढणाऱ्या महायोध्याना माझा सलाम !💐💐 कारण हेच खरे #भारतीयसैनिकांनंतर #देशांतर्गतसैनिक असून जय जवान !जय किसान !! मध्ये समान्यजनतेचे खरे रक्षक आहेत!! म्हणून;
आदरणीय दळवीसाहेब ,तुळसकरसाहेव नि जंगलेसाहेबांना माझा होय;
छ.शिवरायांचा छाव्याचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा सेवकाचा सलाम👌💐💐,.
जय हिंद ! जय जवान!! जय किसान!!!💐👌.