मुक्तपीठ टीम
भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती सराव पुढच्या आठवड्यात आयोजित करण्यात आला आहे. दर तीन वर्षांनी हवाई दल हा सराव आयोजित करते. यावेळी या सरावात राफेलसह १४८ विमाने सहभागी होणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण येथे ७ मार्च या सरावाला सुरुवात होईल. भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, राफेल लढाऊ विमान प्रथमच वायुशक्ती सरावात सहभागी होणार आहेत.
या जोडीने जग्वार लढाऊ विमान, सुखोई-३० लढाऊ विमान, मिग-२९ लढाऊ विमान, तेजस लढाऊ विमान आणि इतर विमाने वायुशक्ती युक्ती-२०२२ मध्ये आपली क्षमता दाखवतील.
या सरावावेळी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि स्पायडर क्षेपणास्त्र प्रणालीची क्षमताही दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
वायुशक्ती सरावाला प्रथमच राफेल…पंतप्रधानांची मुख्य उपस्थिती!
- भारतीय हवाई दल आपली तयारी दाखवण्यासाठी दर तीन वर्षांनी पोखरण रेंजमध्ये वायुशक्ती नावाचे सराव करते.
- एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्यांदाच राफेल लढाऊ विमान या सरावात सहभागी होणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- याआधीचा सराव २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला होता.
या वर्षीच्या सरावात १०९ लढाऊ विमानं
- या वर्षीच्या सरावात भाग घेणार्या हवाई दलाच्या १४८ विमानांपैकी १०९ लढाऊ विमाने आहेत.
- ते म्हणाले की, जग्वार लढाऊ विमान, सुखोई-३० लढाऊ विमान, मिग-२९ लढाऊ विमान, तेजस लढाऊ विमान आणि इतर विमाने वायुशक्ती युक्ती-२०२२ मध्ये आपली क्षमता दाखवतील.
- या सरावावेळी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली आणि स्पायडर क्षेपणास्त्र प्रणालीची क्षमताही दाखवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
- त्यांनी सांगितले की वाहतूक विमाने सी-१७ आणि सी-१३०जे देखील या सरावाचा भाग असतील.