Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

राज्यातील सिट्रस इस्टेटसह फलोत्पादन विभागाचा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला आढावा

March 3, 2022
in सरकारी बातम्या
0
फलोत्पादन विभागाचा फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी घेतला आढावा

मुक्तपीठ टीम

अमरावती जिल्ह्यातील उमरखेड, नागपूर जिल्ह्यातील ढीवरवाडी, वर्धा जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणाच्या सिट्रस इस्टेटविषयी कार्यवाहीच्या प्रगतीसह फलोत्पादन विभागाचा सविस्तर आढावा  रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतला.

            

फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या ब्रह्मगिरी या शासकीय निवासस्थान येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. के.पी.मोते यावेळी उपस्थित होते.

            

मोसंबी फळपिकाची उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात निर्माण करण्यासाठी तालुका फळरोपवाटिका-पैठण, जि. औरंगाबाद या फळरोपवाटिका प्रक्षेत्रावर उच्च तंत्रज्ञानावर आधारित फळरोपवाटिका स्थापन करुन या प्रक्षेत्रावर मोसंबीचे जातीवंत मातृवृक्ष लागवड करणे, मोसंबी फळपिकाच्या शास्त्रोक्त लागवड पध्दतीच्या फळबागा विकसित करण्यासाठी शेतकऱ्यांना कीड-रोगमुक्त उच्च दर्जाची कलमे पुरेशा प्रमाणात किफायतशीर दराने उपलब्ध करुन देण्याविषयाच्या कामांची माहिती संदीपान भुमरे यांनी घेतली.

            

उच्च तंत्रज्ञान आधारित रोपवाटीकांची स्थापना, प्रशासकीय इमारत, कार्यालय, प्रयोगशाळा, प्रशिक्षण भवन, निविष्ठा विक्री केंद्र इ. बांधकामाची माहितीही घेतली. तसेच कलेक्शन, ग्रेडिंग, कोटिंग, पॅकिंग, साठवणूक युनिटी स्थापना याविषयी चर्चा केली. अवजारेबँक स्थापना, पाणी, माती, पाने चाचणी प्रयोगशाळा आणि जिवाणू खते उत्पादन, संत्रा वाण विकसित करणे, शेतकरी प्रशिक्षण व तंत्रज्ञान प्रात्यक्षिक आदी विविध विषयाचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.


Tags: Citrus EstateSandipan Bhumareफलोत्पादन विभागसंदिपान भुमरेसिट्रस इस्टेट
Previous Post

फी नाही शिक्षण नाही! मुंबईच्या आयईएस मॉडर्न इंग्लिश स्कूलला बालहक्क आयोगाची नोटीस!

Next Post

‘हे’ दाऊद शरण सरकार! बाळासाहेब ठाकरे असते तर मंत्र्याला काढून टाकले असते! – फडणवीस

Next Post
Devendra Fadanvis (2)

'हे' दाऊद शरण सरकार! बाळासाहेब ठाकरे असते तर मंत्र्याला काढून टाकले असते! - फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!