मुक्तपीठ टीम
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार घोषणाबाजी पाहायला मिळाल्या. भाजपाच्या आमदारंनी नवाब मलिकांचा राजीनाम्याची मुद्दा धरून लावला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक होत अटकेत असलेला मंत्री अद्याप पदावर कसा? असा प्रश्न विचारला. बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी एका मिनिटांत मलिक यांची हकालपट्टी केली असती, असंही ते पुढे म्हणाले.
काय म्हणाले फडणवीस?
- एखादा मंत्री जेलमध्ये आहे.
- तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, अशाप्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे.
- मंत्र्यांवरील आरोप साधासुधा नाही.
- रिमांड आर्डरमध्ये ही केस कशी आहे, हे लिहिलं गेलं आहे.
- मुंबई बाँब स्फोटाच्या आरोपींकडून कवडीमोल भावात जमीन विकत घ्यायची.
- ती जमीन तिसऱ्याच व्यक्तीची जमीन मालकाला एक पैसा द्यायचा नाही.
- त्या जमिनीचा कब्जा मिळवून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसिना पारकर हिला पंचावन्न लाख रुपये द्यायचे. हे पैसे कुठे वापरले गेले?
मुंबई बाँबस्फोटाकरिता हा पैसा वापरला गेला.
फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
- हे सगळ प्रकरण उघडकीस आलं. मंत्री जेलमध्ये गेले.
- तरीही हे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहत असेल, तर हे दाऊत समर्पित सरकार आहे, असंच आम्हाला म्हणावं लागेल.
- म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी भाजपनं लावून धरली.
- बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी एका मिनिटांत मलिक यांची हकालपट्टी केली असती
- संजय राठोड जेलमध्ये गेले नव्हते तरी तुम्ही नैतिकतेच्या आधारावर त्यांचा राजीनामा घेतला.
- इथं नबाव मलिक थेट जेलमध्ये आहेत, त्यामुळं नवाब मलिकांना वाचविण्याचं कारण काय, त्यांच्यामागे नेमके कोण आहेत.
- कोणाच्या दबावाखाली नवाब मलिक यांना वाचविलं जात आहे.
- नवाब मलिकांबाबत आम्ही सरकारला जाब विचारला आहे.
- सरकार पड काढतंय.
- नवाब मलिक यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीत झालाच पाहिजे, महाराष्ट्रात पहिल्यांदा असं होत आहे.