मुक्तपीठ टीम
गेल्या नऊ दिवसांपासून शेतीसाठी दिवसाला दहा तास वीज पुरवठा मिळावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची सरकारने दखल न घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या मागणीसाठी ४ मार्च रोजी राज्यभर ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही चर्चेला बोलावले असले तरी मात्र आंदोलन सुरु ठेवून चर्चेला जाणार आहोत, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
- स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतीला दिवसा वीज मिळावी यासाठी आक्रमक झाली आहे.
- शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
- या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही.
- राज्य सरकारनं यासंदर्भात अद्याप ठोस पावलं उचलेली नाहीत त्यामुळं ४ मार्च पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती राजू शेट्टी यांनी दिली होती.
- राज्य सरकारकडून चर्चेचं निमंत्रण आल्यास आंदोलन सुरु ठेवत चर्चा सुरु करणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
- राजू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून आंदोलन करत आहे.
- रात्रीच्या वेळी वीज मिळत असल्यानं शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं.
- रात्रीच्या वेळी सर्पदंश आणि विंचू चावण्याचा धोका, यासह वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांना धोका असतो.
- त्यामुळं राजू शेट्टी यांनी शेतीला दिवसा वीज मिळावी म्हणून आंदोलन सुरु केलं आहे.
शेतीपंपास दिवसा वीज आपला हक्क आहे.
याकरिता राज्यातील सर्व शेतकर्यांनी ४ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज्यभर ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन करून आपली ताकत दाखवून द्या. pic.twitter.com/fYLnivsOft
— Raju Shetti (@rajushetti) March 2, 2022
नितीन राऊत यांचा फोन आल्याची राजू शेट्टींची माहिती
- आमच्या मागण्यांबाबत चर्चेचे दरवाजे आम्ही बंद केले नाहीत.
- ऊर्जामंत्री राऊत यांचा फोन आला होता.
- आंदोलन सुरू ठेवून चर्चा करण्याची तयारी असल्याचं त्यांना कळवलं आहे.
- या आंदोलनाची दखल सरकारने तातडीने दखल न घेतल्यास भडका उडेल,’ असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.