मुक्तपीठ टीम
एमिटी युनिव्हर्सिटी मुंबई तर्फे ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ साजरा करण्यात आला. युनिव्हर्सिटीच्या एमिटी स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजीतर्फे ‘एमीविज्ञान’ २०२२ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी तीन स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या स्पर्धेत विज्ञानाची शापशिडी असं या स्पर्धेचं नाव होतं. यात प्रत्येक दोन सदस्य असलेले १४ संघ सहभागी झाले होते. या संघांना जगातल्या शाश्वत शहरांची नावं देण्यात आली होती. बर्लिन, सिंगापोर, कोपनहेगन, व्हिएन्ना, ग्रेनोब्ल, हेलस्किनी, स्टॉकहोम, ब्रिस्टॉल, ऑरोविले, पॅरीस, टोकियो, रेक्जाविक, झुरीक आणि लंडन अशी संघांची नावं होतं. या स्पर्धेत विद्यार्थ्यांना विज्ञानाचा शाश्वत व्यवस्थापनासाठी होणाऱ्या वापराबाबत प्रश्न विचारण्यात आले. यासाठी सापसिडी खेळाचा वापर करण्यात आला. सापसिडीच्या खेळाप्रमाणे संघ आपल्या उत्तरानुसार मागे पुढे होत होते. यामुळं या खेळाचा आनंद विद्यार्थ्यांना लुटता आला.
दुसरी स्पर्धा होती इनोव्हेशन फॉर सस्टेनेबिलीटी फ्युचर. म्हणजे जागतिक पातळीवर शाश्वत भविष्यासाठी कुठली वैज्ञानिक उपाययोजना करता येईल?याचं सादरीकरण विद्यार्थ्यांना करायचं होतं. यात २० पेक्षा जास्त संघांनी भाग घेतला. भविष्यातली जगाची गरज लक्षात घेता पर्यावरण पुरक कोणत्या उपाययोजना करता येतील. त्यासाठी कुठल्या पध्दतीचं नियोजन करावं लागेल यावर सर्वच संघानी भर दिला.
विज्ञानपट म्हणजेच सायन्स फ़िक्शन सिनेमे फक्त कथानकापुरतेच मर्यादित आहेत की त्यांचा प्रत्यक्षात काही संबंध आहे. ही होती तिसरी स्पर्धा. जिचं नाव देण्यात आलं होतं सिसेरिया सिजन दोन. सायन्स फिक्शन सिनेमांची दृश्य दाखवून विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष विज्ञानाशी असलेला संबंध स्पष्ट करायचा होता. एखाद्या सायन्स फिक्शन सिनेमात दिसणारी गोष्ट प्रत्यक्ष कशी असू शकते याचं विश्लेषण विद्यार्थ्यांना करायचं होतं. ही वैयक्तिक स्पर्धा होती. १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन इफेक्टचा शोध लावला. यासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९८६ पासून या दिवशी भारतानं वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा उत्सव साजरा करण्यात येतो.
पाहा व्हिडीओ: