मुक्तपीठ टीम
मुंबई लगतच्या पालघर जिल्ह्यातील वसईचा परिसर म्हणजे कला-गुणांची खाणच. याच वसईतील एका कलाकाराने भन्नाट कलासाधनेनं महादेवाला वंदन केलंय. कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर कुंचल्यातून भगवान शिवशंकर अवतरलवले आहेत.
महाशिवरात्रीच्यां निमिताने वसईतील भाताणे गावातील कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर भगवान शिव साकारले आहेत. या साठी चित्रकार कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर रंग रंगोटी करून चक्क शिवशंकरांचं दर्शन घडवलं आहे अवघ्या वीस मिनिटांच्या अल्प कालावधीत त्यांनी हे चित्र पूर्ण केले आहे.
बेलाच्या पानावर भोलेनाथ शिव यांचं चित्र रेखाटण्याचा उद्देश असा आहे की कथेमध्ये , समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शीव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच भगवान शिवाचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. म्हणून चित्रकार कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर शिव साकारले. आहेत कौशिक जाधव हे प्रत्येक वेळी नवनवीन विषयावर सुंदर कलाकृती करत असतात.