Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाचा ८ मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह

March 1, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
International Women's Day Week

मुक्तपीठ टीम

महिला आणि बालविकास मंत्रालय १ ते ८ मार्च दरम्यान ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताह’ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग म्हणून एक विशेष सप्ताह म्हणून साजरा करणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आठवडाभर साजऱ्या होणाऱ्या या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आणि महिलांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाशी संबंधित विविध विषयांवर आधारित समाज माध्यम उपक्रमांचे आयोजन होणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि तज्ञ यांच्या भागीदारीने आणि महिला आणि बालकांच्या आणि त्यांच्या संरक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी थेट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. या सोहळ्याचा प्रारंभ उद्यापासून म्हणजेच एक मार्चपासून ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांच्या सहकार्याने महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी केला जाणार आहे. या दिवशी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग देखील आपला वर्धापनदिन साजरा करणार आहे. या कार्यक्रमात बालकांवर विशेष भर असेल आणि बालकांच्या एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल आणि बालकांना लाल किल्ल्याची मार्गदर्शनपर सफर घडवण्यात येईल.

 

सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी ८ मार्च २०२२ रोजी नारी शक्ती पुरस्कार आणि सर्व राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांच्या महिला पोलिस प्रतिनिधींसाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन परिषद या दोन प्रमुख कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे. महिलांच्या असामान्य कामगिरीचा सन्मान करण्यासाठी आणि विविधता असलेल्या उपस्थितांमध्ये एक संघटित बळ म्हणून भारतभरात स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करण्याची भावना जागृत करण्यासाठी हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्त्री-पुरुष समानता, समता आणि महिलाच्य सक्षमीकरणासंदर्भात झालेल्या प्रगतीचा गौरव या दिवसाच्या निमित्ताने करण्यात येईल. त्याचबरोबर या संदर्भात झालेल्या उल्लेखनीय कामगिरींचे प्रभावी दर्शन घडेल आणि स्त्री-पुरुष समानतेला चालना देण्याचा ध्यास निर्माण होईल.


Tags: International Women's Day WeekUnion Ministry of Women and Child Developmentआंतरराष्ट्रीय महिला दिन सप्ताहकेंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव
Previous Post

मुंबईतील नाले सफाईसाठी १५० कोटी! विकास कामांसाठी शेवटच्या महिन्यात २ हजार कोटी!

Next Post

एसटी संप काही संपेना…नागपुरात पगार मिळत नसल्यानं मनपाच्या कंत्राटी स्टार बससेवेचे कामगार संपावर!

Next Post
Star Bus Workers on strike

एसटी संप काही संपेना...नागपुरात पगार मिळत नसल्यानं मनपाच्या कंत्राटी स्टार बससेवेचे कामगार संपावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!