मुक्तपीठ टीम
रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती भडकत आहेत. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसचे नवे दर जाहीर केले जातात. त्यानुसार १ मार्च रोजी एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. आजपासून १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शिवाय ५ किलोचा एलपीजी सिलिंडर २७ रुपयांनी महागला असून तो ५६९ रुपये इतका झाला आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र सध्यातरी कोणताही बदल झालेला नाही. असं असलं तरीही उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकांच्या ७ मार्चच्या शेवटच्या टप्प्यानंतर घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत वाढण्याची शक्यता आहे.
दर निवडणुकीच्यावेळी घडतं तसंच यावेळीही घडलं. पाच राज्यांमधील निवडणुका जवळ येताच गॅस दरवाढ बंद झाली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२१ पासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय बदल झाला आहे. याशिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त वाढ झाली आहे. अशा स्थितीत निवडणुकीनंतर ईपीजीच्या किमतीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
१ फेब्रुवारीला झाली होती कपात
- देशातील ऑइल कंपन्यांनी १ फेब्रुवारीपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ९१.५० रुपयांची कपात केली होती.
- या कपातीनंतर मुंबईतत १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १९०७ रुपये आहे.
- मात्र आता त्याची किंमत वाढल्यानंतर नवे दर लागू होणार आहेत.
निवडणुकांमुळे किमती वाढल्या नाहीत:
- रशिया-युक्रेन युद्धामुळे जगात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहे.
- मात्र, पाच राज्यांतील निवडणुकांमुळे त्याची किंमत वाढलेली नाही.
- अशा परिस्थितीत ७ मार्च रोजी उत्तरप्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर त्याची किंमत वाढू शकते.
मुंबईत १९६३ रुपयांपर्यंत व्यावसायिक गॅस
- दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्या एलपीजीच्या किमतीत सुधारणा करतात.
- जानेवारी २०२२ मध्ये, व्यावसायिक गॅसच्या किमतीत कपात करण्यात आली होती, परंतु फेब्रुवारीमध्ये त्याची किंमत वाढली आहे.
- या वाढीनंतर, आज म्हणजेच १ मार्च २०२२ पासून दिल्लीत १९०७ रुपयांऐवजी १९ किलोचा एलपीजी सिलिंडर २०१२ रुपयांना मिळणार आहे.
- मुंबईत किंमत १९६३ रुपयांपर्यंत वाढली आहे.