मुक्तपीठ टीम
भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने भारतावर २२७ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे इंग्लंडने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय कसोटीमध्ये शानदार कामगिरी करेल अशी आशा होती. पण चेन्नईच्या मैदानात भारतीय संघाला अपयश पत्करावे लागले आहे.
चौथ्या डावात भारतासमोर ४२० धावांचे आव्हान होते. याचा पाठलाग करताना भारताला १९२ धावा करता आल्या. कर्णधार विराट कोहलीने एक हाती झुंज देत ७२ धावा केल्या, पण त्याचे प्रयत्न पुरे पडले नाही. जॅक लीचने ४ तर जेम्स अँडरसनने ३ गडी बाद करत इंग्लंड संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रोहित शर्माने ३९ धावा केल्या होत्या. पाचव्या दिवशी भारतीय संघाने इथूनच खेळण्यास सुरवात केली. शुभमन गिल (१५ धावा) आणि चेतेश्वर पुजारा (१२ धावा) करत आपल्या खेळाचे पुढे नेतृत्व केले. ३८ षटकात १५ धावा करत चेतेश्वर पुजारा बाद झाला. त्यानंतर शुभमनने विराट कोहलीबरोबर डाव सावरला आणि त्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतक केल्यानंतर शुभमन गिल बाद झाला.
त्यानंतर मैदानात उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळण्यास उतरला. पण तीन षटकार खेळून तोही बाद झाला. पहिल्या डावात चांगली खेळी केलेला ऋषभ पंत याला चांगली कामगिरी करता आली नाही. तो ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरही शुन्यावर बाद झाला.
कोहली आणि अश्विनने ६४ धावांची भागीदारी केली. त्यांनी १७१ धावांपर्यंत संघाला नेले. अश्विन धावा करण्यात अपयशी ठरला, मात्र त्यांनी कोहलीला चांगली साथ दिली. पण जॅक लीचने अश्विनला बाद केले. त्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पहिल्या कसोटी सामना इंग्लंडने आपल्या नावावर केला.