Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जया बच्चन यांचा सल्ला, मोदी-योगी आदित्यनाथांनी आश्रमात जावं, त्यांचं राजकारणात काय काम?

February 27, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Jaya Bacchan Yogi And modi

मुक्तपीठ टीम 

भाजपाच्या कडवट टीकाकार मानल्या जाणाऱ्या खासदार जया बच्चन या उत्तरप्रदेशात आक्रमक प्रचार करत आहेत. भाजपावर हल्ला चढवत त्या समाजवादी पार्टीला सत्तेत आणण्यासाठी मतदारांना आवाहन करत आहेत. नुकत्याच एका प्रचारसभेतील भाषणात त्या म्हणाल्या की, “योगी-मोदी यांनी आश्रमात जावं, त्यांचा राजकारणाशी काय संबंध आहे? १५ वर्षांपासून मी महिलांच्या संरक्षणासाठीचे काम करत आहे. महिला सुरक्षेबाबत योगी सरकारने केलेले दावे पोकळ आहेत. भाजपचे सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजप फक्त शहरं आणि रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचे काम करत आहे.”

 

जौनपूरच्या मडियाहून आणि मछलीशहरात जाहीर सभांना संबोधित करताना सपा नेत्या आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांच्यासह कन्नौजच्या माजी खासदार डिंपल यादवही उपस्थित होत्या. जया बच्चन म्हणाल्या की, “अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशला एक्स्प्रेस वेचा रस्ता दाखवला. ते लोकांच्या हृदयावर राज्य करतात. जया यांनी मछलीशहरमध्ये त्यांच्या निधीतून महिलांच्या सुरक्षेसाठी सल्लागार कक्ष सुरू करण्याचे आश्वासन दिले. मंचावरूनच त्यांनी अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये झालेल्या विकासकामांवर कविता ऐकवली.”

 

“वातावरण तापवणाऱ्यांना माहित नाही की, हवामान बदलले आहे”- कन्नौजच्या माजी खासदार डिंपल यादव

  • माजी खासदार डिंपल यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर पलटवार करत म्हटले की, वातावरण तापवणाऱ्यांना हवामान बदलले आहे हे माहीत नाही. भाजपला कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवावे लागेल असे दिसते.
  • आपल्या भाषणात कोणाचेही नाव न घेता त्या म्हणाल्या की, जौनपूरमध्ये क्रिकेट खेळले जाते. तुम्ही लोकांनी संपूर्ण संघाला क्लीन बोल्ड केले.
  • सपाचे सरकार आल्यास पाच वर्षे मोफत रेशनसोबत तेल-तूपही देऊ, असे आश्वासन दिले.
  • महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात येणार असून २२ लाख नोकऱ्याही देण्यात येणार आहेत.
  • महिलांचे पेन्शन १८०० रुपये प्रति महिना केले जाईल.
  • १२वी उत्तीर्ण विद्यार्थिनींना सरकार ३६ हजार एक रकमी देणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलात महिलांची भरती करण्यात येणार आहे.

Tags: Jaya Bachchanpm modiyogi adityanathजया बच्चननरेंद्र मोदीयोगी आदित्यनाथ
Previous Post

हैदराबादचे वादग्रस्त आमदार बोलले, तेच योगी आदित्यनाथांनी सुनावलं! माझ्या सभेत बुलडोझर उभे!

Next Post

बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांवर गुन्हा! परमबीरनंतर आरोपी झालेल्या दुसऱ्या आयपीएस!

Next Post
Rashmi Shukla

बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्लांवर गुन्हा! परमबीरनंतर आरोपी झालेल्या दुसऱ्या आयपीएस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!