मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या आक्रमक वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, “बघा माझ्या सभेत बुलडोझरही उभे आहेत.” तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांचाही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी उत्तरप्रदेशातील मतदारांना भाजपाला मतदानासाठी धमकावल्याचा आरोप झाला होता. जे भाजपाला मतदान करणार नाहीत, त्यांनी योगी आदित्यनाथांनी मागवलेले बुलडोझर उत्तरप्रदेशकडे निघाल्याचं म्हटलं होतं. तो वादाचा विषय ठरला होता. आता खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथच तसं बोलले आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांच्या सुलतानपूरमधील सभेनंतर भाजप नेते डॉ. महेंद्र सिंह यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या रॅलीचे मुख्य आकर्षण रॅलीजवळ लावण्यात आलेले बुलडोझर होते. मुख्यमंत्री योगी यांनी शहरालगतच्या कटकाच्या कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी रांगेत पाच बुलडोझर लावले होते. बुलडोझरवर मुख्यमंत्री योगींचे मोठे पोस्टर लावण्यात आले. ज्यावर ‘बाबा का बुलडोझर’ असे लिहिले आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बुलडोझर
- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक रॅलीत बुलडोझरचा उल्लेख करत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
- लखनौमध्ये नुकत्याच झालेल्या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगींनी सपावर हल्लाबोल केला होता.
- योगी आदित्यनाथ म्हणाले की, एक्स्प्रेस वे बनवण्यासाठी आणि माफियांविरोधातही बुलडोझर उपयुक्त आहे.