Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्यांना अटकेची भीती? अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

February 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
neil somaiya

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर अटकपूर्व जामीनासाठी भाजपा नेते किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. २३ फेब्रुवारीला नील सोमय्या यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश शुक्रवारी उपलब्ध न झाल्याने नील सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्यांवर आरोप केले होते. ‘निकॉन इन्फ्रा’ कंपन्याच्या माध्यमातून जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात अनेक जमीन नील सोमय्यांनी घेतल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता. सोमय्या बाप-बेटे तुरुंगात जातील, असे विधानही राऊतांनी केले होते. मात्र एकीकडे किरीट सोमय्या संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा करत असताना दुसरीकडे नील सोमय्या अटक टाळण्यासाठी न्यायालयात गेले आहेत.अटकेपासून बचाव करण्यासाठी नील सोमय्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र संबंधित न्यायालयाचे न्यायाधीश शुक्रवारी उपलब्ध न झाल्याने नील सोमय्या यांच्या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यांच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 

संजय राऊतांनी सोमय्यांवर केलेले आरोप

  • भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत.
  • पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत.
  • सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाइंडच्या कंपनीत संचालक आहे.
  • त्यांनी निकॉन फेज वन आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत.
  • त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत.
  • हरित लवादानं अॅक्शन घेतली पाहिजे, तर त्यांच्यावर कारवाई होईल.
  • वसईतील मौजे गोखिवरे येथे सोमय्यांनी एक प्रोजेक्ट केला आहे.
  • वाधवानला यांनीच ब्लॅकमेल केलं आणि लुबाडलं.
  • आपल्या फ्रंटमॅनच्या नावे व्यवहार केले.
  • कॅशही घेतली. १०० कोटी घेतले.
  • लधानीच्या नावावर त्यांनी जमिनी घेतल्या.
  • ४०० कोटी रुपयांची जमीन फक्त ४.४ कोटी रुपयांना केली, अशा वेगवेगळ्या जमिनी घेतल्या.
  • या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी.
  • आदित्य ठाकरेंना माझं आवाहन आहे, की याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा.
  • पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाइंडच्या अकाऊंटमधून भाजपला २० कोटींचा निधी गेला.

Tags: Kirit SomaiyaNeil SomaiyaRakesh Wadhawansanjay rautकिरीट सोमय्यानील सोमय्यासंजय राऊत
Previous Post

नवाब मलिक घाबरणार नाहीत, ओढून ताणून दाऊदशी उगाचच जोडण्याचा प्रयत्न! – जयंत पाटील

Next Post

सीमेवर पती तैनात, पत्नीने प्रियकरावर उडवला पगार, नंतर केला बलात्काराचा आरोप, न्यायालयाने खडसावलं!

Next Post
supreme court

सीमेवर पती तैनात, पत्नीने प्रियकरावर उडवला पगार, नंतर केला बलात्काराचा आरोप, न्यायालयाने खडसावलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!