मुक्तपीठ टीम
गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी मनपा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नाशिकमधल्या अनेक मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत बैठकीत १७० इच्छुकांची यादी राज यांच्याकडे सादर करण्यात आली. तसेच त्यांनी मनपा निवडणुकीच्या आगोदर बंड करणाऱ्या अनेकांची काणउघडणी केली. ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जाव असं म्हणाल्याचे समजतंय. तसेच गेल्यानंतर होणाऱ्या परिणामांना देखील सामोरे जा असा दम देखील कार्यकर्त्यांना दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकमधील महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंकडून बंड करणाऱ्या अनेकांना तंबी
- मनपा निवडणुकांच्या अनुशंगाने अनेक पक्षांकडून संवाद यात्रा आणि बैठका घ्यायला सुरू केल्या आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मुंबईत नाशिकमधील अनेक मनसेच्या नेत्यांची बैठक घेतली.
- त्यामध्ये ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जाव असं म्हणाल्याचे समजतंय.
- तसेच गेल्यानंतर होणाऱ्या परिणामांना देखील सामोरे जा असा दम देखील कार्यकर्त्यांना दिला.
- त्यामुळे मनपा निवडणुकीच्या अगोदर बंड करणाऱ्या अनेकांना तंबी दिल्याची चर्चा आहे.
१७० इच्छुकांची यादी राज ठाकरेंकडे सादर
- उपस्थित बैठकीत १७० इच्छुकांची यादी राज यांच्याकडे सादर करण्यात आली.
- राज ठाकरे लवकरचं नाशिक दौऱ्यावर जाणार असून तिथल्या स्थानिक नेत्यांनी किंवा नाशिक दौरा झाल्यानंतर इच्छुकांची यादी जाहीर होईल.
- कारण तिथं जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचं समजतंय.
- मनपाच्या निवडणुकीला पुर्णपणे ताकदीने सामोरे जाण्याचा आदेश दिल्याने अनेक कार्यकर्त्यांना पुन्हा जोश आल्याचं चित्र दिसत आहे.
- नाशिकमधील मनसेचे मुंबईत झालेल्या बैठकीला अनेकजण उपस्थित राहिले होते, अनेकांची गैरहजेरी होती.
- त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांची नाराजी देखील जाणून घेतली जाणार असल्याची राज ठाकरे यांनी सांगितले.