मुक्तपीठ टीम
ईडीकडून नवाब मलिकांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच आयकर विभागाकडून शिवसेना नेते आणि मुंबई मनपाचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत चव्हाणांच्या घरी धाड टाकण्यात आली आहे. त्यांच्या घरी फक्त तपासणी आहे की कारवाई हे स्पष्ट नाही. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या ईडी अटकेविरोधातील निदर्शनांमध्ये शिवसेनेकडून यशवंत जाधवांच्या आमदार पत्नी यामिनी या सर्वात आधी सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे आयकर पथकाला जाधवांच्या घरी धाडीसाठी आजचा मुहूर्त मिळाला का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. मनपा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं असताना हा शिवसेनेसाठी मनपाचा खजिना सांभाळणाऱ्या स्थायी समिती अध्यक्षांवरील आयकर धाड अडचणी वाढवणारी मानली जाते.
बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर भाजपा नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे आता संजय राऊतांनंतर शिवसेनेचा आणखी एका बडा नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचं मानलं जातं. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातो.
यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर छापा…
- आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती.
- त्यामुळेच आयकर विभागाने ही धाड टाकली असल्याची माहिती पुढे आली आहे.
- आगामी मनपा निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागानं छापा घातला आहे.
- यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागानं छापा घातला आहे.
- सकाळी सहा वाजता जाधवांच्या घरी आयकर विभागाचं पथक दाखल झालं आहे.
- दरम्यान, य पथकासोबत CISF पथकंही असल्याची माहिती मिळत आहे.
किरीट सोमय्यांचा यशवंत जाधवांवर मनी लॉण्ड्रिंगचा आरोप –
- यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता.
- यशवंत जाधव यांचे पितळ उघडे करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचे म्हटलं होतं.
- यशवंत जाधव यांनी अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल १५ कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे.
- भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात आरोप केले होते.
- आयकर विभागाच्या नोटीसला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकण्यात आली.
- गेल्या तासाभरापासून यशवंत जाधव यांची चौकशी सुरु आहे.