मुक्तपीठ टीम
रशिया आणि युक्रेनमधील परिस्थिती अधिक चिघळत चालली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या जोरदार हल्ल्यात युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियन हल्ल्यात १३७ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ३१६ लोक जखमी झाले आहेत. रशियन सैन्याने चेर्नोबिल ताब्यात घेतले आहे.
गुरुवारी सकाळी युक्रेनवरील रशियन हल्ल्याने राजधानी कीव, खार्किव, निप्रो, ओडेसा आणि इतर अनेक शहरांवर हल्ला चढवला आहे. रशियाने हवाई हल्ले करून जमिनीवर गोळीबार केला. युक्रेनने सांगितले की, त्यांच्या लष्करी कमांड सेंटर्स, हवाई तळ आणि लष्करी साठ्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. त्याच्या सीमा रक्षकांनी क्रिमियामध्ये प्रवेश करणाऱ्या रशियन लष्करी वाहनांचे व्हिडिओ जारी केले.
रशियन सैन्याने शेजारील देश बेलारूसवरही तोफखान्याने हल्ला केला आहे. रशियन सैन्याने दावा केला आहे की, त्यांनी युक्रेनची संपूर्ण हवाई संरक्षण यंत्रणा काही तासांतच नष्ट केली, त्यामुळे नागरी लोकसंख्येला कोणताही धोका नाही. रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे ४० लोक मारले गेल्याचे युक्रेनने म्हटले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की त्यांच्या देशाने मॉस्कोशी राजनैतिक संबंध तोडले आहेत. रशियाचा जगभरातून निषेध होत आहे. निषेध आणि निर्बंधांकडे दुर्लक्ष करून, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इतर देशांना चेतावणी दिली की रशियन कारवाईत हस्तक्षेप करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास असे परिणाम भोगावे लागतील की त्यांनी यापूर्वी कधीही पाहिलेले नाही.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी संवाद
- रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली.
- नाटो सैन्य आणि रशियामध्ये असलेले मतभेद हे केवळ पारदर्शक संवादाच्या माध्यमातून सुटू शकतात असं पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.
- या दोन नेत्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटांची चर्चा झाली आहे.
- पंतप्रधानांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.
- त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी भारत प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.