मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर मनी लॉन्ड्रिग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. याप्रकरणी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आघाडीचे नेते आणि भाजपाकडून आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. यात आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. शरद पवारसाहेब मोठे नेते आहे, त्यांना आम्ही काय सांगणार, पण सामान्य माणसाला कळतं एवढ्या मोठ्या नेत्यांनी यापासून आपल्याला वाचवलं पाहिजे, एवढ्या मोठ्या प्रकरणात स्वत:ला जोडणं योग्य नाही असे आशिष शेलार म्हणाले.
कारवाईला उत्तर देताना
- आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की,…शंका असेल तर न्यायालयाचा दरवाजा आहे.
- चुकीचा गैरसमज होत असेल तर जनतेचा दरबार आहे.
- मात्र तपास यंत्रणेच्या कारवाईला उत्तर देता येत नाही, म्हूणून भाजपवर हल्ला करायचा! याला आम्ही घाबरत नाही.
- या हल्ल्याला आम्ही मूळ आरोपापासून पलायन मानतो.
- थयथयाट तीच लोकं करतात, जी प्रश्नांचं उत्तर देऊ शकत नाहीत.
- गेल्या काही दिवसांपासून जे चाललंय ते सगळं समोर आहे.
- ईडी एनआयएच्या ज्या कारवाया चालल्या आहेत.
ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे का?
- राज्याचे पोलीस डोळे बंद करुन होते का?
- सरकारला काय माहीत नव्हतं, दाऊदचा पैसा ज्यात वापरला जातोय, त्याची कुणाला माहीत नाही का?
- तपास यंत्रणांना काही माहित नाही, दाऊदच्या हस्तकांपर्यंत जायचं नाही का?
- त्या दाऊदची बहीण कोण ती हसीना पारकर, ती गेल्यानंतरही सामान्य लोकांचे प्रॉपर्टी बळकावल्या असतील, तर तपास यंत्रणांनी डोळे बंद करायचे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची अपेक्षा आहे का?
हस्तक कोण तर बॉम्बब्लास्टचा शिक्षापात्र आरोपी!
- इतकंच नाही तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडूनच यंत्रणावर दबाव टाकला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय.
- हे दोन्ही पक्ष फक्त आणि फक्त गुन्हेगारांची बाजू घेतात का? हा प्रश्न आहे.
- सगळ्या गोष्टी समोर येतात, त्याचं कॅरेक्टर सर्टीफिकेट देण्याचं काम संजय राऊतांना दिलं का?
- दाऊद आणि त्यांच्या हस्तकाबाबत ईडी चौकशी करते, त्याच्यावर तुम्ही हल्ला करणार? या राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे की नाही?
- हस्तक कोण तर बॉम्बब्लास्टचा शिक्षापात्र आरोपी!