Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कांदळवन संवर्धनासाठी सिडकोचे प्रयत्न, आतापर्यंत २०० हेक्टर कांदळवन वन विभागाला हस्तांतर!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mangroves

मुक्तपीठ टीम

कांदळवनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. कांदळवनांचे “राखीव वने” म्हणून संरक्षण व्हावे, या उद्देशाने सिडकोकडून कांदळवनांचे हस्तातंरण करण्यात येत आहे. सिडकोकडून नुकतेच दुसऱ्या टप्प्यात ६८ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण करण्यात आले आहे. आतापर्यंत सिडकोने अंदाजे २००० हेक्टर जमीन वनविभागाला सोपवली आहे. कांदळवनांच्या जमिनींचे एवढे मोठे क्षेत्र हस्तांतरण करणारी सिडको ही एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव सरकारी संस्था आहे.

 

सिडकोकडून २१ फेब्रुवारी २०२२ रोजी दुसऱ्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकारक्षेत्रातील ६८.४ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते एम आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक यांना सदर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण करण्यात आले. या आधीच्या पहिल्या टप्प्यात सिडकोने आपल्या अधिकारक्षेत्रातील २८१.७७ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तातंरण केले आहे. कांदळवनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन, कांदळवनांचे “राखीव वने” म्हणून संरक्षण व्हावे, या उद्देशाने सिडकोकडून कांदळवनांचे हस्तातंरण करण्यात आले आहे.

 

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सिडकोच्या कांदळवन हस्तांतरणामागील उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले, “सिडको पर्यावरणाचे जतन व शाश्वत विकास करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे. नवी मुंबईचे नियोजन करताना, सिडकोने उद्यान, क्रीडांगणे आणि एनडीझेडसह (Non Development Zone) सुमारे ४०% क्षेत्र हरितक्षेत्रासाठी ठेवले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत सिडकोने अंदाजे २००० हेक्टर जमीन वनविभागाला सुपूर्द केली आहे. त्यामुळे कांदळवनांच्या जमिनींचे एवढे मोठे क्षेत्र हस्तांतरण करणारी सिडको ही एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव सरकारी संस्था आहे.

 

या प्रसंगी कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, रविकुमार, मुख्य नियोजनकार (बांधकाम परवाना), सतिशकुमार खडके, अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन) आणि सिडकोतील अन्य अधिकारी त्याचप्रमाणे कांदळवन कक्ष, मुंबई यांच्यातर्फे डी. एस. कुकडे, वनक्षेत्रपाल, नवी मुंबईदेखील उपस्थित होते.

 

मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांचे संरक्षण आणि जतन व्हावे याकरिता संबंधित शासन संस्था व प्राधिकरणांकडून आपल्या अधिकारक्षेत्रातील कांदळवन क्षेत्रांचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे करण्यात येत आहे. सिडकोतर्फे यापूर्वी पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील कामोठे येथील १३४ हेक्टर, पनवेल येथील ३८ हेक्टर व कोल्हे-खार येथील १०९ हेक्टर, अशा एकूण २८१.७७ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे ऑगस्ट २०२१ मध्ये वन विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात सिडकोकडून पनवेल तालुक्यातील उलवे येथील २४.२० हेक्टर, वहाळमधील ३.१५ हेक्टर, वाघिवलीतील ३९.९४ हेक्टर आणि

 

सोनखारमधील ०.७५ हेक्टर, अशा एकूण ६८.४ हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण वन विभागाला करण्यात आले. त्याचप्रमाणे सिडकोने कांदळवन कक्षाच्या सहाय्याने ३७०हेक्‍टरवर खारफुटीची लागवड केली आहे.

 

याचबरोबर मॅन्ग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेलदेखील ऐरोली येथे आहे. जमिनीची धूप होण्यापासून वाचवण्यासह पुराचे पाणी व वादळाला अटकाव करण्यामध्ये कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच अनेक पशू-पक्षी व जलचरांचा कांदळवनांमध्ये अधिवास असतो. हे लक्षात घेऊन कांदळवनांना पुरेसे वैधानिक संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून कांदळवन क्षेत्र अधिसूचित करून, सिडकोकडून उपरोक्त कांदळवन क्षेत्राचा ताबा कांदळवन कक्षाला देण्यात आला.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: CIDCOconservation of mangrovesgood newsMangrove Interpretation Cellmuktpeethnavi mumbaiकांदळवन वन विभागकांदळवन संवर्धनचांगली बातमीनवी मुंबईमुक्तपीठमॅन्ग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेलसिडको
Previous Post

सांगलीत मनपाची ‘माझी कृष्णामाई’ स्वच्छता मोहीम, लोकसहभागातून १०० टन कचरा गोळा

Next Post

रायगड वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजन: सुनिल तटकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, अजित पवार, शरद पवार यांची भाषणं

Next Post
रायगड वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजन: सुनिल तटकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, अजित पवार, शरद पवार यांची भाषणं

रायगड वैद्यकीय महाविद्यालय भूमिपूजन: सुनिल तटकरे, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात, अजित पवार, शरद पवार यांची भाषणं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!