मुक्तपीठ टीम
राज्यात सत्तेत भाजपाविरोधात एकत्र असलेल्या महाविकास आघाडीतील तीन पक्ष स्थानिक पातळीवर अनेदा वेगळ्या भूमिकांमध्ये असतात. त्यात नवं नाही. पण सांगलीतील जतमध्ये झालेला भाजपा – राष्ट्रवादी युतीचा प्रयोग काँग्रेसचे स्थानिक आमदार विक्रम सावंतांना चांगलाच धक्का देणारा ठरला.
जतमध्ये सर्व सेवा विकास सोसायटीच्या निवडणुकीत माजी आमदार विलासराव जगताप यांच्या भाजपा-राष्ट्रवादी शेतकरी विकास पॅनेलने विद्यमान आमदार विक्रम सावंत यांच्या काँग्रेस प्रणित शेतकरी सहकारी विकास पॅनेलला आव्हान दिले. माजी आमदार जगताप यांच्या भाजपा-राष्ट्रवादीच्या शेतकरी विकास पॅनेलचे सर्व १३ उमेदवार विजयी झाले असून आमदार विक्रम सावंत यांच्या काँग्रेस प्रणित पॅनेलचा दणदणीत पराभव झाला आहे.
आमदार विक्रम सावंत यांचा पुन्हा एकदा सडकून पराभव
- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत याचा पराभव झाला होता.
- त्यामध्ये विलासराव जगताप याचे प्रकाश जमदाडे हे निवडून आले होते, आणि आता जत विकास सोसायटीच्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून जगताप यांनी आमदार विक्रम सावंत याना पुन्हा एकदा पराभव केला आहे.