मुक्तपीठ टीम
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यूसंबंधित गंभीर आरोप केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार अर्ज सादर केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याची दखल घेत मालवणी पोलिसांना ४८ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एका महिलेवर बलात्कार झाल्याचा आरोप करणं, तसं करताना तिचं नाव घेणं, तेही तिच्या कुुटुंबियांचा विरोध असताना करणं, हे गंभीर मानलं जात आहे.
किशोरी पेडणेकरांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे कारवाईची मागणी…
- मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे.
- श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या.
- तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.
- मृत्यूपूर्वी तिच्यावर बलात्कार झाला नसून त्यावेळेस ती गरोदर देखील नव्हती.
- त्यास तिच्या आईवडिलांनी देखील दुजोरा दिला आहे.
- असे असतानाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिशा सालियान हिचा बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
- ही बाब अतिशय दुर्दैवी व वेदनादायक आहे.
- त्यामुळे मृत्यूनंतरही दिशा सालियान यांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आगोगाकडे केली आहे.
राज्य महिला आयोगाकडून तक्रारीची दखल घेण्यात आली…
- राज्य महिला आयोगाने किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली आहे.
- दिशा सालियान प्रकरणात महिला आयोगाने अहवाल मागवला आहे.
- मालवणी पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश चाकणकर यांनी दिले आहेत.
- दिशा सालियानचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट तिच्या आई वडिलांना मान्य आहे.
- त्यांनी त्याला दुजोरा दिलाय, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. श्रीमती दिशा सालियान या सुशांतसिंग राजपूत यांच्या पूर्व व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे.(1/4) pic.twitter.com/60qtTG4Ij6
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) February 21, 2022
काय म्हणाले होते नारायण राणे?
- काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी खासदार विनायक राऊत यांना इशारा दिला होता.
- खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.
- विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस” आणि आपण कुठे धावणार?,” असे राणेंनी म्हटले होते.