मुक्तपीठ टीम
सध्याच्या काळात बहुतेक शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशाच्यावेळी आधार कार्ड मागितलं जातं. त्यामुळे वय कितीही असो आधार कार्ड तयार असलेलेच कधीही चांगले. आधार कार्ड कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी बनवलं जाऊ शकते. मुलांच्या प्रवेशाच्यावेळी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जाणून घ्या मुलांचं आधार कार्ड कसं बनवायचे?
- मुलांसाठी आधार बनवण्याची प्रक्रिया जवळपास मोठ्यांसाठी आधार बनवण्याच्या प्रक्रियेप्रमाणे असते.
- पालकांना आपला मुलाला घेऊन जवळच्या आधार केअर सेंटरवर जावं लागेल
- तेथे त्यांना एक अर्ज भरावा लागेल. मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड जारी केले जाते.
मुलांचे आधार कार्ड बनण्यापूर्वी पालकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येतात. सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे, ५ ते १५ वर्षांच्या मुलांचे आधारकार्ड बनविण्याच्यावेळी कोणती कागदपत्रे मागितली जातात?
कोणती कागदपत्रं आवश्यक?
- ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी त्यांचे पालकाशी असलेले नाते सिद्ध करणारे कागदपत्र आवश्यक आहेत. उदा. मुलाचा जन्मदाखला
- लहान मुलांचं आधार कार्ड बनवण्यासाठी त्याचं जन्म प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे.
- त्याशिवाय मुलांच्या आई-वडिलांच्या आधार कार्डांची माहितीही देणं गरजेचं आहे.
- आई-वडिलांचा पत्ता आणि ओळखपत्रही आवश्यक आहे.
मुलाआधी आई-वडिल/पालकांचे आधार आवश्यक!
यूआयडीएआयच्या नियमांनुसार मुलाचे आधार यादीमध्ये नाव नोंदण्यापूर्वी आई-वडिल किंवा पालकांची नावे देणे अनिवार्य आहे.
जर ते आधार कार्डधारक नसतील तर मुलाची आधार कार्डसाठी नोंद करता येणार नाही.