मुक्तपीठ टीम
लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी अॅपलने १३ ऑक्टोबर २०२० रोजी आयफोनची १२वी सीरीज लाँच केले होती. या सीरीजमध्ये एकूण चार स्मार्टफोन लाँच केले होते. यात आयफोन १२ मिनी सीरीजचा सर्वात स्वस्त तसेच जगातील सर्वात हलका, छोटा ५ जी स्मार्टफोन होता. हा फोन कंपनीने खासकरुन भारतीय बाजाराला नजरेसमोर ठेऊन बाजारात आणला होता. त्यामुळे आयफोन १२ मिनीची जास्तीत जास्त विक्री होईल अशी कंपनीची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे विक्री झाली नाही. त्यामुळे अॅपलकडून आयफोन १२ मिनी स्मार्टफोनचे उत्पादन बंद केले जाण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या दुसर्या तिमाहीत आयफोन १२ मिनीचे उत्पादन करायचे की नाही यावर अॅपल कंपनीकडून विचार केला जाऊ शकतो. तसेच २०२१मध्ये अॅपल आपल्या नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यामुळे बाजारात सर्वात कमी मागणी असणाऱ्या आयफोन १२ मिनी या स्मार्टफोनचे उत्पादन कंपनी थांबवू शकते, असेही एका अहवालात म्हटले आहे.
आयफोन १२ मिनीचे फिचर्स
• फोनची स्क्रीन ५.४ इंच आहे.
• फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
• ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.
• ३२१० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.